Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवी मुंबईतील सर्व शाळांनी शालेय बस धोरणची अंमलबजावणी करावी, मनसेचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला पत्र

नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात डीपीएस शाळेतील 4 वर्षांच्या विद्यार्थ्यावर स्कूल बस चालकाने लैंगिक अत्याचार केला होता. हीच बाब लक्षात घेत, मनसेने शालेय बस धोरणची अंमलबजावणी करावी असे पत्र

  • By मयुर नवले
Updated On: Jul 19, 2025 | 08:24 PM
नवी मुंबईतील सर्व शाळांनी शालेय बस धोरणची अंमलबजावणी करावी, मनसेचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला पत्र

नवी मुंबईतील सर्व शाळांनी शालेय बस धोरणची अंमलबजावणी करावी, मनसेचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला पत्र

Follow Us
Close
Follow Us:

नवी मुंबईतील सीवूड्स परिसरातील डीपीएस शाळेतील केवळ चार वर्षांच्या विद्यार्थ्यावर स्कूल बस चालकाने केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण नवी मुंबई हादरून गेली आहे. या घटनेने पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मनविसेच्या वतीने शहर अध्यक्ष श्री. गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक शिष्टमंडळ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दत्ता सांगोलकर यांची भेट घेऊन ‘शालेय विद्यार्थी वाहतूक धोरण २०११’ च्या तात्काळ आणि काटेकोर अंमलबजावणीची मागणी केली.

राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी २०११ मध्ये स्कूल बस धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार, प्रत्येक शाळेने स्वतंत्र ‘परिवहन समिती’ स्थापन करून शालेय वाहनांची कागदपत्रे, अग्निशमन यंत्रणा, प्रथमोपचार सुविधा, वाहने चालवणाऱ्या चालकांची पार्श्वभूमी तपासणी, कंत्राटी करार याची तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र, अनेक खासगी शाळा या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे मनसेच्या निदर्शनास आले आहे.

मनविसे शिष्टमंडळाने यावेळी काही महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या:

  • प्रत्येक शाळेत परिवहन समितीची स्थापना करण्यात यावी, ज्यामध्ये मुख्याध्यापक, पालक प्रतिनिधी, शिक्षक, पोलीस निरीक्षक, स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी, बस कंत्राटदार यांचा समावेश असावा.
  • शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ १०० मीटर परिसरात परवानाधारक नसलेल्या खाजगी वाहनांना थांबण्यास बंदी असावी.
  • सर्व शाळा बसमध्ये प्रथमोपचार पेटी, अग्निशमन यंत्रणा, योग्य विमा आणि फिटनेस प्रमाणपत्र असणे बंधनकारक करावे.
  • चालक आणि वाहकांची पार्श्वभूमी तपासणे व त्यांना योग्य प्रशिक्षण देणे अनिवार्य असावे.
  • बसमधून विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे आणण्याबाबत शाळा प्रशासन जबाबदार धरले जावे.

या सर्व मागण्या शासन नियमांनुसार आहेत, आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे याची तात्काळ अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

शिष्टमंडळाने स्पष्टपणे सांगितले की, जर प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दत्ता सांगोलकर यांनी मनसेच्या मागण्या गांभीर्याने घेत सर्व शाळांमध्ये बस तपासणी मोहीम सुरु करण्याचे आश्वासन दिले. ही कारवाई उद्यापासूनच सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या शिष्टमंडळात शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, रोजगार शहर अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, अनिकेत पाटील, उपशहर अध्यक्ष प्रतीक खेडकर, सहसचिव मधुर कोळी, विपुल पाटील, नितीन काटेकर, शाखाध्यक्ष चेतन कराळे, उपविभाग अध्यक्ष चिन्मय हमरुसकर, शुभम काळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: All schools in navi mumbai should implement school bus policy mns writes to regional transport office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2025 | 08:24 PM

Topics:  

  • Marathi News
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

नवी मुंबई विमानतळ जमीन वाद चिघळला; रोहित पवारांविरोधात बिवलकरांचा १००० कोटींचा मानहानीचा दावा
1

नवी मुंबई विमानतळ जमीन वाद चिघळला; रोहित पवारांविरोधात बिवलकरांचा १००० कोटींचा मानहानीचा दावा

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था
2

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Navi Mumbai : जुन्या वादातून दोन गटांत तलवार, कोयत्याने एकमेकांवर हल्ला; परिसरात भितीचं वातावरण
3

Navi Mumbai : जुन्या वादातून दोन गटांत तलवार, कोयत्याने एकमेकांवर हल्ला; परिसरात भितीचं वातावरण

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪
4

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.