Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Elections 2024 : सोशल मीडियाद्वारे हायटेक प्रचारावर भर; उमेदवारांकडून बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर

विधानसभा निवडणुकीत प्रचारात बदलत्या तंत्रज्ञानानुसार डिजिटलचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. ग्रामीण भागात सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराची स्मार्ट पद्धत अवलंबली जात आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 17, 2024 | 05:23 PM
Maharashtra Elections 2024 : सोशल मीडियाद्वारे हायटेक प्रचारावर भर; उमेदवारांकडून बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर

Maharashtra Elections 2024 : सोशल मीडियाद्वारे हायटेक प्रचारावर भर; उमेदवारांकडून बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : विधानसभा निवडणुकीत प्रचारात बदलत्या तंत्रज्ञानानुसार डिजिटलचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. ग्रामीण भागात सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराची स्मार्ट पद्धत अवलंबली जात आहे. सध्या जिल्ह्यात उमेदवारांकडून फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, यु-ट्युब, ट्विटरच्या माध्यमातून हायटेक प्रचाराची यंत्रणा प्रभावीपणे राबविली जात आहे.

वीस-पंचवीस वर्षांपूर्वी निवडणूकांचा प्रचार करताना उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मतदारापर्यंत प्रत्यक्ष पोचण्याव्यतिरिक्त इतर पर्याय नव्हता. त्यावेळी जाहीर सभा, घोंगडी बैठकांवर आणि नात्यागोत्यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोचण्याचा उमेदवारांचा आटापिटा चाललेला असायचा. संपर्क यंत्रणेच्या अभावी कानाकोपऱ्यात गावोगावी जाताना सर्वांचीच दमछाक व्हायची. त्या काळात बैलगाडी, दुचाकी, टेम्पो, जीप, ट्रक अशा वाहनांमधून गावोगांवी जात कर्ण्यांच्या स्पीकरवरून घोषणा देत, गाणी म्हणत आणि पथनाट्याच्या माध्यमातून प्रचार केला जात होता. गावोगावी घरांच्या भिंतीवर उमेदवाराचे नाव आणि चिन्ह रंगविले जायचे. बिल्ले, झेंडे अशा प्रकारच्या प्रचार साहित्यांचा घराघरांत वापर केला जात होता.

सध्याच्या काळात सोशल मीिडयाचा वापर निवडणूक प्रचारासाठी वाढला आहे. दरम्यान, सोशल मीडियावरून आरोप, प्रत्यारोप गाजत आहेत. वेगवेगळ्या आकर्षक सजावटींचे बॅनर, व्हिडिओ या माध्यमातून मतदारांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न चालू आहे. एकंदर नेटकऱ्यांच्या माध्यमातून आधुनिक स्वरूपाचा स्मार्ट प्रचार उमदेवारांकडून सुरू आहे.

गावोगावी दाखविली जातेय डिजिटल स्क्रीन

फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, यु-ट्युब, ट्विटर या ऑनलाइन यंत्रणेमुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात घडलेली घटना काही मिनिटात लोकांना कळू लागली. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे प्रचाराचे प्रभावी साधन ठरले आहे. पक्षांची, उमेदवारांच्या प्रगतीची, घेतलेल्या निर्णयाची सचित्र माहिती देणाऱ्या डिजिटल स्क्रीन गावोगावी धावत आहे. निरनिराळी स्लोगन वापरून भविष्याचे व्हीजन स्क्रीनवर दाखवून मतदारांना प्रभावित केले जात आहे.

हे सुद्धा वाचा : रश्मी शुक्लांबाबत नाना पटोलेंचं राज्यपालांना पत्र; म्हणाले, यांना आता…

थेट संपर्कासाठी व्हॉट्‌सॲप प्रभावी माध्यम

पक्षांतील ज्येष्ठ, श्रेष्ठ नेत्यांच्या सभांची भाषणे तळागाळात पोचविण्यासाठी आणि ती कधीही ऐकण्यासाठी यु-ट्युब हे प्रभावी माध्यम ठरले आहे.त्यामुळे मोबाईल, लॅपटॉप, संगणकावर इंटरनेटवर यु-ट्युबला खूप पसंती दिली जात आहे. ग्रामीण भागातील स्थानिक न्यूज चॅनलचीही या माध्यमातून मोठी चलती होऊ लागली आहे. त्याचप्रमाणे मतदारांशी थेट संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सॲप अतिशय प्रभावी माध्यम ठरले आहे. व्हॉट्स अपद्वारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते पक्षाची, उमेदवारांची माहिती, व्हीजन, विविध भाषणांचे ऑडिओ, व्हिडिओ, पक्षांची विकाससूत्री आदि माहिती पाठविली जात आहे.

Web Title: All the candidates for the assembly elections are campaigning heavily through social media nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 05:23 PM

Topics:  

  • Maharashtra Election

संबंधित बातम्या

Municipal Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश
1

Municipal Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश

ZP Elections2025: जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकांसाठी नवी आरक्षण पद्धत; काय आहे नवा फॉर्म्युला?
2

ZP Elections2025: जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकांसाठी नवी आरक्षण पद्धत; काय आहे नवा फॉर्म्युला?

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवर जोरदार टीका; म्हणाले, “सलीम जावेद यांच्याशी संपर्क…’
3

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवर जोरदार टीका; म्हणाले, “सलीम जावेद यांच्याशी संपर्क…’

Rahul Gandhi Press : राहुल गांधी यांनी थेट दाखवले पुरावे! निवडणूक आयोगावर मत चोरीचा गंभीर आरोप
4

Rahul Gandhi Press : राहुल गांधी यांनी थेट दाखवले पुरावे! निवडणूक आयोगावर मत चोरीचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.