रुग्णवाहिका चालकांचे पोट भरणार कसे? मागील 26 महिन्यांपासून पगार रखडला, आरोग्य मंत्र्यांनी घेतली भेट
सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका सेवा पुरविणार्या कंत्राटी रुग्णवाहिका चालकांना गेल्या २६ महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही.
पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका सेवा पुरविणार्या कंत्राटी रुग्णवाहिका चालकांना गेल्या २६ महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक संकटास सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात सोलापूर जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालकांनी मोहोळ विधानसभा मतदार संघाचे आमदार राजु खरे यांची भेट घेत आपली व्यथा मांडली आणि यासंदर्भात योग्य तो निर्णय घेण्याचे अश्वासन त्यांनी दिले.
सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका सेवा पुरविणार्या कंत्राटी रुग्णवाहिका चालकांना गेल्या २६ महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही.आणि फक्त पाच वाहन चालकांना न्यायलयाच्या आदेशानुसार किमान वेतन 19,900 प्रमाणे दहा महिन्याचे वेतन मिळाले. उर्वरित वाहनचालकांना असेच ताटकळत ठेवले आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक संकटास सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 77 वाहन चालकांनी मोहोळ विधानसभा मतदार संघाचे आमदार राजु खरे यांची भेट घेत आपली व्यथा मांडली आणि यासंदर्भात योग्य तो निर्णय घेण्याचे अश्वासन त्यांनी दिले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 102 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमार्फत नवजात शिशू, बाळंतीण महिला, गरोदर मातांची तपासणी, ऑपरेशन शिबिरासाठी येणार्या महिलांना ने-आण करणे, तसेच सर्पदंशसारख्या रुग्णांसह दर महिन्याला आरोग्य केंद्रात औषधे व लस आणणे आदी अत्यावश्यक सेवा देण्यात येतात. ही सेवा पुरविताना रुग्णवाहिका चालक महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असतो. परंतु, त्यांच्याच पगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या चालकांना गत २६ महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याने नुकतेच आमदार राजु खरे यांनी चालक संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक पंढरपूरमध्ये आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीतमध्ये घेतली. यावेळी आबिटकर यांनी उपस्थित सर्व रुग्णवाहिका चालक यांचेशी चर्चा करून सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना नवीन निविदा प्रक्रिया थांबवण्याच्या सक्त सुचना देत वाहन चालकांना जिल्हा परिषद मार्फत कंत्राटी तत्वावर आदेश देण्यास सांगितले. तसेच चालकांचे पगारी प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे सांगितले आहे. तरी जिल्हा आरोग्य अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी हे आरोग्य मंत्र्यांच्या आदेशाला कितपत प्रतिसाद देतात हे पाहवे लागेल.
सोलापूर जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालकांना गेल्या कित्येक महिन्यांपासून पगारच मिळाला नसुन या चालक संघटनेचे पदाधिकारी यांनी वेळोवेळी न्यायालयासह आरोग्य विभागातील वरीष्ठ अधिकारी, मंत्री महोदय यांचेकडे आपली कैफियत मांडली आहे तथापि यावर कोणताही निर्णय झाला नाही अखेर आमदार राजु खरे यांचे माध्यमातून नुकतेच राज्याचे आरोग्य मंत्री आबिटकर यांनी या वाहनचालकांची प्रश्न जाणून घेतल्याने लवकरच यावर तोडगा निघेल अशी आशा जिल्ह्यातील सर्व रुग्ण वाहिका चालकांना आहे.
Web Title: Ambulance drivers in solapur district have not received their salaries for 26 months