Photo Credit : Social Media
अमरावती: लोकसभा निवडणूक 2024 मधील पराभवानंतर माजी खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत वक्तव्य केले आहे. नुकतेच अमरावती येथे युवा स्वाभिमान पक्षाने आयोजित केलेल्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या समारोप कार्यक्रमात त्यांनी आगामी निवडणुकीत सहभागी होण्याचे संकेत दिले. नवनीत राणा यांनी राजकारणाच्या नव्या क्षेत्रात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे जाहीर केले आहे.
काय म्हणाल्या नवनीत राणा?
नवनीत राणा या कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या की, आज मी पहिल्यांदाच मुलांच्या भविष्याबद्दल बोलण्यासाठी आले आहे. असे कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि प्रेरणादायी असतात. आपल्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे कौतुक झाले तर आपण अधिक मेहनत करतो. माझ्या राजकीय प्रयत्नात मी अयशस्वी झाले तरी मी कधीच हार मानली नाही. माझ्या पराभवाने काही लोक खूश होते, पण एक चमकणारा तारा नेहमीच चर्चेत राहतो, मग तो कुठेही असो.”
“काही लोकांना वाटतं की आपण नवनीत राणांना गमावलं आणि आता आपण रवी राणानांही गमावू, पण जनतेचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. मी हरले असले तरी मी कधीच हार मानली नाही. माझ्या पराभवानंतर आमदार रवी राणा यांनी माझं मनोबल वाढवलं. आणि मला पुन्हा उठण्यासाठी सुचवले आहे. विशेष म्हणजे एक शेर ऐकवत नवनीत राणांनी पुन्हा येण्याचे संकेत दिले आहेत.
लौटेंगे फिर एक दिन उसी अंदाज में
लौटेंगे फिर एक दिन उसी अंदाज में
कई बादल छाने से सूरज का अस्तित्व खत्म नहीं होता!