प्रकल्पांत 45 टक्केच जलसाठा; मेळघाटात जलसंकट, टँकरद्वारे पाणीपुरवठा
अमरावती जिल्ह्यातील जलाशयांमधील पाणीसाठा जवळपास निम्म्याहून कमी म्हणजे 45.24 टक्यांवर आला आहे. मे महिन्यातील तीव्र उन्हाला अजून काही दिवस शिल्लक आहेत. तत्पूर्वीच जिल्ह्याभरातील जलसकंट तोंड वर काढत आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात, तर पाण्यासाठी हाहाकार सुरु झाला आहे. बराचश्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु झाला आहे.
विदर्भपाटबंधारे विकास महामंडळ (नागपूर) अंतर्गत स्थानिक जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयाच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील 1 मोठे, 7 मध्यम आणि 48 लघु प्रकल्पांसह एकूण 56 जलप्रकल्पांची पाणीसाठा क्षमता 1047.30 दशलक्ष घनमीटर दलघमी आहे. ज्यामध्ये 473.84 दलघमी पाणी आहे. आगामी काळात तीव्र उन्हाच्या झळामुळे पाणीसाठा आणखी कमी झाल्याने जलसंकट गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि, 564.05 दलघमी क्षमतेचा एकमेव मोठा प्रकल्प मोर्शीच्या अप्पर वर्धा प्रकल्पात 273.03 दलघी म्हणजेच 48.41 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
मेळघाटातील अनेक गावांमध्ये पाण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे. चुर्णी गावात तर 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा केला जात आहे. ग्रामपंचायतीकडून कोणतीही व्यवस्था केली जात नसल्याने, चुर्णीतील रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
, मराठवाडा तेलंगणा, अंतर्गत कर्नाटक मार्गे मन्नारच्या आखातापर्यंत कमी दाबाची द्रोणिय स्थिती आहे (कमी दाबाचा पट्टा). राजस्थान आसाम वर चक्राकार वारे वाहत आहेत. पश्चिमी विक्षोभ आणि द्रोणिय स्थिती यांच्या प्रभावाखाली 30 एप्रिलपर्यंत विदर्भात काही ठिकाणी तुरळक प्रमाणात, तर काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलक्या/मध्यम पाऊस व विजांचा गडगडाट आणि वेगवान वाऱ्याची शक्यता आहे. सोमवारी (दि. 28) संपूर्ण विदर्भात तुरळक ते विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यता. आहे. पूर्व विदर्भात पावसाचा जोर जास्त राहील. 29 एप्रिल ते 1 मेपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. यादरम्या पुढील तीन दिवसात कमाल तापमानात घट येण्याची आणि त्यानंतर वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्रा. अनिल बंड यांनी दिली.
Maharashtra Weather: महाराष्ट्रावर घोंघावतेय दुहेरी संकट; ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट
50 गावात तर 10 ते 12 दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक व महिला त्रस्त आहेत. गेल्या महिनाभरापासून नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. गावातील पाणीपुरवठा योजनेची विहीर कोरडी पडली आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. गेल्या महिनाभरापासून पाणीटंचाई आहे.
73 गावांमध्ये 33 बोअरवेल व 55 विहिरींतून पाणीपुरवठा
उष्णतेच्या लाटेमुळे सगळीकडील जलस्तर घटत आहे. सद्या स्थितीत जिल्ह्याचा पारा 44 अंशावर गेला आहे. त्यामुळे जलस्त्रोतातील पाण्याचे वाष्पीभवन वाढलेले आहे. त्यामुळे 84 गावांमध्ये पाणीबाणी निर्माण झलेली आहे. उपाययोजना म्हणून 10 गावांमध्ये 18 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर 73 गावांमध्ये अधिग्रहणातील 33 बोअरवेल व 55 खासगी विहिरींच्या माध्यमातून नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे.