शेतकऱ्यांच्या जमिनीत जाणारे रस्ते आणि जल प्रवाह यांना एरिना कल्पतरू कंपनी कडून अडथळे, शेतकऱ्यांची तहसीलदार यांच्याकडे तक्रार
कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायत मध्ये असलेल्या वर्णे येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे एरिना कल्पतरू कंपनी विरुद्ध तक्रार केली आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये जाणारे रस्ते खुले करावेत आणि नैसर्गिक जल प्रवाह यांना अडथळे निर्माण केले आहेत. ते खुले करावेत यासाठी वर्ने गावातील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन देवून केली आहे.
आचार्य महाविद्यालयाची मुजोरी; CET परीक्षेच्या विद्यार्थ्यांकडून उकळले पैसे
पळसदरी ग्रामपंचायत मधील काही गावात कल्पतरू बिल्डर कडून जमीन विकसित केली जात आहे.त्या कंपनीने त्या ठिकाणी शेकडो एकर जमिनीची खरेदी केली असून त्यात काही शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी कल्पतरू बिल्डरला दिल्या नाहीत.मात्र संबंधित बिल्डर कडून मौजे वर्णे येथे एरीना आर्चडस प्रायव्हेट लिमिटेड (कल्पतरू एरींना) यांनी त्यांच्या जागेमध्ये विशेष नियोजन प्राधिकरण कडून रेखांकन मंजूर केले आहे. प्रत्यक्ष विकास कामे करतेवेळी लगतधारक शेतकऱ्यांच्या जागेमध्ये जाणारे रस्ते आणि नैसर्गिक जल प्रवाहाला अडथळा निर्माण केलेला आहे.तसेच अनेक ठिकाणी मंजूर रेखांकणाचे उल्लंघन केलेले दिसून येते.
महत्वाची बातमी! पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
त्यामुळे शेतकऱ्यांचे जमिनी मधील रस्त्यावर बांधकाम केले आहे.त्याचा परिणाम शेतकऱ्यांना आपल्या जमिनीमध्ये जाता येत नाही. त्याचवेळी शेतकऱ्यांच्या जागेमध्ये जाणारे रस्ते आणि नैसर्गिक जल प्रवाहाचा मार्ग पूर्ववत करण्यात यावा. तसे न केल्यास शेतकऱ्यांचे भविष्यात कधीही न भरून येणारे असे अतोनात नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेवटचा पर्याय म्हणून तहसीलदार यांच्याकडे धाव घेतली असून येथील धारक शेतकऱ्यांना लोकशाहीच्या मार्गाने आंदोलनात्मक पवित्रा घेऊन आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला आहे. त्याबाबत तेथील पांडुरंग शिर्के,सुरेश शिर्के,दिनेश नरे,संजय म्हापदी,संतोष देशमुख यांनी कर्जत तहसीलदार यांच्याकडे जावून एरिना कल्पतरू बिल्डर ने रस्ते मोकळे करावेत आणि नैसर्गिक जल प्रवाह पुन्हा कार्यान्वित करण्यात यावेत अशी मागणी केली आहे.