
नायलॉन मांजा वापराल तर खबरदार! महानगरपालिका प्रशासनाचा इशारा (फोटो सौजन्य-Gemini)
उच्च न्यायालय व राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार नायलॉन मांजाची निर्मिती, विक्री, साठा, वाहतूक व वापर पूर्णतः प्रतिबंधित करण्यात आला, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नायलॉन मांजाचा वापर किंवा साठा करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध ६ महिन्यांपर्यंत कारावास व किमान १० हजार रुपये दंड अशी तरतूद आहे. तसेच नायलॉन मांजाची निर्मिती, विक्री किंवा विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध ०३ ते ०५ वर्षांपर्यंत कारावास व किमान १ लाख रुपये दंड अशी कठोर शिक्षा करण्यात आली. या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अमरावती महानगरपालिकेने नायलॉन मांजा जप्तीची विशेष मोहीम हाती घेतली आहे.
सहाय्यक क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली झोननिहाय ज्येष्ठ स्वास्थ निरीक्षक व स्वास्थ निरीक्षकांची पथके गठित करण्यात आली असून, या पथकांमध्ये महसूल व पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच उच्ब न्यायालयाच्या निर्देशानुसार पतंग व मांजा विक्रीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची संमती अनिवार्य करण्यात आली आहे. संबंधित मंडळाची संमती नसताना पतंग व मांजा विक्री करणाऱ्या सर्व आस्थापनांवर तत्काळ सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित विक्रेत्यांनी त्वरित प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल आवश्यक संमती प्राप्त करावी, असे आवाहन करण्यात आले. महानगरपालिकेने सर्व पालकांनाही विशेष आवाहन केले असून, आपल्या पाल्यांकडून नायलॉन मांजाचा वापर किंवा साठा होत असल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई होऊ शकते. त्यामुळे त्यांच्या भवितव्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
नायलॉन मांजामुळे मानवजीवनासह पक्ष्यांना मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण होतो. मकरसंक्रांतीदरम्यान पक्ष्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते. नायलॉन धागा अविघटनशील असल्याने तो नष्ट होत नाही. तसेच दुचाकीस्वार व पादचा-यांना गंभीर होणे त्याच्या संपकांमुळे प्रवाह खंडित होणे, शॉक तरीय जीवितहानी होण्याच्या घटना घडतात. या पार्श्वभूमीवर शहरातील कोणाच्याही नागरिकानी पतंग उडविताना नायलॉन मांजाचा वापर करू नये, तसेच कोणत्याही विक्रेत्याने नायलॉन मांजाची विक्री, साता किंवा वाहतूक करू नये, असे ठाम आवाहन अमरावती महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.