Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

होळीची रंगत वाढणार! अमरावतीच्या बाजारात ‘बॅकपॅक’ आणि ‘कार्टून’ पिचकाऱ्यांची क्रेझ

२ मार्चला होळी आणि ३ मार्चला रंगपंचमी साजरी होणार असल्याने बाजारपेठा रंगीबेरंगी पिचकाऱ्यांनी सजल्या आहेत. मुलांसाठी कार्टून आणि विविध आकर्षक डिझाइनच्या सुरक्षित पिचकाऱ्यांना मोठी मागणी आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 23, 2026 | 07:46 PM
होळीपूर्वी बाजारात रंगीबेरंगी पिचकाऱ्यांची धूम

होळीपूर्वी बाजारात रंगीबेरंगी पिचकाऱ्यांची धूम

Follow Us
Close
Follow Us:
  • बच्चे कंपनीसाठी विविध आकारातील पिचकाऱ्या
  • बाळांच्या सुरक्षिततेला प्राधान्य
  • बच्चेकंपनीत मोठा उत्साह, खरेदीला प्रारंभ
Holi Special : येत्या २ मार्च रोजी होळी सण मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, तर ३ मार्च रोजी रंगपंचमी साजरी होणार आहे. त्यामुळे सण जवळ येताच शहरातील बाजारपेठा रंगीबेरंगी पिचकाऱ्यांनी फुलून गेल्या आहेत. विशेषतः लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी यंदा विविध आकर्षक, सुरक्षित आणि हलक्या वजनाच्या पिचकाऱ्यांची मोठी रेलचेल दिसून येत आहे. स्थानिक बाजारात कार्टून थीमवरील पिचकाऱ्या, टैंक मॉडेल, प्रेशर पंप पिचकारी, बॅकपॅक (टाकी) पिचकारी तसेच हातात धरून वापरता येणाऱ्या छोट्या पिचकाऱ्यांना मोठी मागणी आहे.

Amravati Assembly : अमरावतीत आमसभेत कचऱ्यावर रणधुमाळी; पहिलीच सभा गाजली; ३० मिनिटांत ११ प्रश्नांचा भडका

बच्चे कंपनीसाठी विविध आकारातील पिचकाऱ्या

मुलांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन सुपरहिरो, अॅनिमेशन पात्रे आणि प्राण्यांच्या आकारातील पिचकाऱ्या उपलब्ध आहेत. रंगीत आणि आकर्षक डिझाइनमुळे मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यापाऱ्यांच्या मते, यंदा हलक्या व मजबूत प्लास्टिकपासून बनवलेल्या पिचकाऱ्यांना अधिक पसंती मिळत आहे. पालकांकडून सुरक्षिततेवर भर दिला जात असल्याने टोकदार कडा असलेल्या पिचकाऱ्यांना टाळण्यात येत आहे.

सुरक्षिततेवर विशेष भर

मोचीगल्लीतील एका विक्रेत्याने सांगितले की, बाळांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत डिझाइनमध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच हर्बल व त्वचेस अनुकूल रंगांचे पॅकेट्स आकर्षक सवलतीत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सध्या शाळांच्या परीक्षा सुरू असल्यामुळे ग्राहकसंख्या तुलनेने कमी असली तरी परीक्षा संपताच बाजारात मोठी गर्दी होईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तरीही सायंकाळच्या वेळी बाजारात पालकांसोबत पिचकारी खरेदीसाठी आलेल्या मुलांची चांगलीच वर्दळ दिसत आहे.

किमतीत विविधता आणि खरेदीचा उत्साह

बाजारात ५० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत विविध किमतींच्या पिचकाऱ्या उपलब्ध असल्याने सर्व स्तरातील नागरिक आपल्या मुलांसाठी खरेदी करत आहेत. होळीच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण असून, रंगांच्या या सणाने लहानग्यांच्या चेहऱ्यावर आधीच आनंदाची उधळण केली आहे. यंदाची होळी अधिक सुरक्षित आणि आनंददायी व्हावी, यासाठी पालकांनी मुलांना नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचे आवाहनही केले आहे. रंगपंचमीचा जल्लोष रंगीबेरंगी पिचकाऱ्यांसह साजरा करण्यासाठी अमरावतीकर सज्ज झाले आहेत.

Amravati News: १२ तास वीजपुरवठ्याची घोषणा हवेतच; उपाययोजनांची गरज, पीक नष्ट आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

Web Title: Holi rangpanchami 2026 pichkari market shopping trends amravati marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 07:46 PM

Topics:  

  • Amaravati
  • amaravati news
  • holi

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांनो, एचटीबीटी बियाण्यांपासून दूर राहा! उल्लंघन केल्यास ५ वर्षे कारावास, १ लाखाचाही होऊ शकतो दंड
1

शेतकऱ्यांनो, एचटीबीटी बियाण्यांपासून दूर राहा! उल्लंघन केल्यास ५ वर्षे कारावास, १ लाखाचाही होऊ शकतो दंड

३ महिन्याचे रेशन मिळणार आता एकत्र! पुरवठा विभागाचा पुढाकार; पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गरिबांना सुविधा
2

३ महिन्याचे रेशन मिळणार आता एकत्र! पुरवठा विभागाचा पुढाकार; पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गरिबांना सुविधा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.