Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरद पवार गटाला खिंडार; अमरावतीत नेमकं घडलं काय?

लोकसभा निवडणुकीत प्रदीप राऊत यांच्याकडे अमरावती आणि वर्धा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती. पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच त्यांना पदावरून पायउतार केल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 11, 2024 | 09:27 AM
शरद पवार गटाला खिंडार; अमरावतीत नेमकं घडलं काय?
Follow Us
Close
Follow Us:

अमरावती : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. कोणत्याही क्षणी निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे शरद पवार यांच्या गटात जोरदार इमकमिंग सुरू असताना अमरावतीतील शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिल्याची बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदीप राऊत यांना जिल्हाध्यक्ष पदावरून पायउतार केल्याने शरद पवार गटाचे पदाधिकारी नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याचे सांगितले जात आहेत. विधानसभेपूर्वी अचानक असे राजीनामे दिल्याने शरद पवार गटाला खिंडार पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:  अशा व्यक्ती ह्या ‘भारतरत्न’च नाहीत तर काय मग अजून? राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत प्रदीप राऊत यांच्याकडे अमरावती आणि वर्धा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती. पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच त्यांना पदावरून पायउतार केल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. प्रदीप राऊत यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले असले तरी त्यांच्याकडे प्रदेश संघटन सचिव ही नवी जबाबदारी देण्यात आली. यामुळेही राऊत यांच्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.

हेही वाचा: महानवमीच्या दिवशी हे मूलांक असणाऱ्या लोकांवर राहील देवी लक्ष्मीचा आशीर्वाद

पक्षाने केलेल्या या कारवाईनंतर प्रदीप राऊत यांनी बंडखोरी करत आपल्याला विश्वासात न घेता पदावरून काढले असल्याची प्रतिक्रीया देत नाराजी व्यक्त केली आहेत. तसेच, गेल्या पाच महिन्यांत आम्ही पक्ष संघटना मजबूत केली,  संघटनेसाठी काम केले पण कुठलेही कारण न देता किंवा चर्चा न करता आपल्याला पदावरून काढून टाकण्यात आले. हा आपल्या पक्षनिष्ठेचा आणि कार्याचा अपमान आहे.  याबाबत आम्ही लवकरच पक्षश्रेष्ठी शरद पवार यांची भेट घेणार आहोत. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यास ठिक, अन्यथा आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असेही प्रदीप राऊत यांनी स्पष्ट केले.

Web Title: Resignation of office bearers of sharad pawar group in amravati nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2024 | 09:22 AM

Topics:  

  • Amravati Politics
  • jayant patil
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: निवडणूक प्रक्रियेला वेग; मनपा अर्ज छानणीची प्रक्रिया सुरू
1

Maharashtra Politics: निवडणूक प्रक्रियेला वेग; मनपा अर्ज छानणीची प्रक्रिया सुरू

‘कराडमध्ये आघाडीचा निर्णय अपेक्षेप्रमाणे ठरला’; जयंत पाटील यांचे विधान
2

‘कराडमध्ये आघाडीचा निर्णय अपेक्षेप्रमाणे ठरला’; जयंत पाटील यांचे विधान

Jayant Patil Meet Uddhav Thackeray: मातोश्रीवर घडामोडींना वेग! मुंबईसाठी जयंत पाटलांचे ठाकरेंना गाऱ्हाणे?
3

Jayant Patil Meet Uddhav Thackeray: मातोश्रीवर घडामोडींना वेग! मुंबईसाठी जयंत पाटलांचे ठाकरेंना गाऱ्हाणे?

गद्दारी करणाऱ्यांना त्यांच्याच प्रभागात जागा दाखवू; आमदार जयंत पाटलांचा इशारा
4

गद्दारी करणाऱ्यांना त्यांच्याच प्रभागात जागा दाखवू; आमदार जयंत पाटलांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.