• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raj Thackeray Write Letter To Pm Modi For Awarding Ratan Tata By Bharat Ratna

अशा व्यक्ती ह्या ‘भारतरत्न’च नाहीत तर काय मग अजून? राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना

उद्योगक्षेत्रामध्ये क्रांती करणारे रतन टाटा हे कालावश झाले आहे. जगभरातील सर्वांना त्यांनी भावनिक निरोप दिला. रतन टाटा यांच्या कार्याबद्दल त्यांना भारतरत्न देण्यात अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली आहे. यावर आता राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 11, 2024 | 08:44 AM
raj thackeray reaction on Ratan Tata Bharat Ratna

रतन टाटा भारतरत्न देण्याबाबत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. (फोटो - एक्स)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : उद्योगरत्न रतन टाटा हे अनंतामध्ये विलीन झाले आहेत. देशभरातून अतिशय भावनिक निरोप देण्यात आला. राज्य सरकारकडून उद्योग क्षेत्रामध्ये क्रांती करणाऱ्या रतन टाटा यांना मरणोत्तर सन्मान दिला जात आहे. राज्यातील उद्योग भवनाचे नाव रतन टाटा उद्योग भवन असे करण्यात आले असून पुरस्कारचे नाव देखील बदलण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्य सरकारकडून रतन टाटा यांना भारतरत्न द्या अशी शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. याबाबत बैठक घेत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याच्या राज्य सरकारच्या मागणीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिका मांडली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करुन त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या प्रयत्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. यामधून राज ठाकरे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, ज्येष्ठ उद्योगपती आणि गेल्या ३ दशकांत भारतीय उद्योगजगताला आकार देणारे रतन टाटा यांचं निधन झालं. रतन टाटांना तुम्ही पण जवळून ओळखायचात, आणि त्यातून तुमच्याही लक्षात आलं असेल की, कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवणारी व्यक्ती होती. पण भारतीय उद्योगजगाला, भारतीय अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेलं योगदान आणि त्याहून महत्वाचं माणूस म्हणून जे त्यांचं मोठेपण आहे, ते अफाट होतं. अशा व्यक्तीला खरंतर ते हयात असतानाच ‘भारतरत्न’ सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवं होतं. पण आता किमान त्यांना मरणोत्तर भारतरत्न घोषित व्हायला हवी अशी माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आणि अपेक्षा आहे, तसच तमाम भारतीयांची देखील याहून काही वेगळी अपेक्षा असेल असं मला वाटत नाही !”

“काल रतन टाटांच्या निधनाची बातमी बाहेर आल्यावर अनेक ठिकाणचे कार्यक्रम लोकांनी स्वतःहून थांबवून श्रद्धांजली वाहिली, मुंबईत तर काही ठिकाणी दांडिया देखील अर्ध्यावर थांबवून लोक २ मिनीट स्तब्ध उभे राहीले! आज सकाळपासुन सोशल मीडियावर तमाम भारतीय उस्फुर्तपणे श्रद्धांजली वाहत आहेत, आणि प्रत्येकाच्या मनातील भाव असा आहे की आपल्या अगदी घरातील कोणीतरी व्यक्ती गेली आहे. अशा व्यक्ती ह्या ‘भारतरत्न च नाहीत तर काय मग अजून ? त्यामुळे याबाबतीत तुम्ही संबंधितांना निर्देश देऊन यावर काही निर्णय घ्याल याची मला खात्री आहे.”

पुढे ते म्हणाले की, ” तसंच भारत हा रत्नांची खाण आहे. पण या रत्नांचा सन्मान कुठल्याही नागरी सन्मानाने करताना तो त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या योग्य टप्प्यावर व्हावा. मुळात कोणाला मरणोत्तर सन्मान घोषित करायची वेळच येऊ नये. त्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती हयात असताना आणि शारीरिक दृष्ट्या उत्तम अवस्थेत असताना झालेला कधीही चांगला. आपण अनेकदा बघतो की एखाद्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती शारीरिक जर्जर अवस्थेत असताना होतो, हे योग्य नाही. या विषयी काही निश्चित धोरण आपण आखाल याची मला खात्री आहे,” असा विश्वास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Raj thackeray write letter to pm modi for awarding ratan tata by bharat ratna

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2024 | 08:44 AM

Topics:  

  • raj thackeray
  • Ratan Tata

संबंधित बातम्या

“मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न; राज ठाकरेंनी RSS मोहन भागवतांना सुनावले खडेबोल
1

“मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न; राज ठाकरेंनी RSS मोहन भागवतांना सुनावले खडेबोल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पीएमआरडीएचा 300 कोटींचा आराखडा तयार; 27 गावांमध्ये 1209 कोटींचे सांडपाणी प्रकल्प

पीएमआरडीएचा 300 कोटींचा आराखडा तयार; 27 गावांमध्ये 1209 कोटींचे सांडपाणी प्रकल्प

Feb 16, 2026 | 12:38 PM
Priyank Kharge Critiziced RSS: ‘आरएसएस हा सैतान, भाजप त्याची सावली…’ प्रियांक खरगेंचा घणाघात

Priyank Kharge Critiziced RSS: ‘आरएसएस हा सैतान, भाजप त्याची सावली…’ प्रियांक खरगेंचा घणाघात

Feb 16, 2026 | 12:34 PM
Maharashtra Politics : टिपू सुलतान प्रकरणी ‘आ बैल मुझे मार’अशी अवस्था; वातावरण बिघडताच संजय राऊत स्पष्टच बोलले

Maharashtra Politics : टिपू सुलतान प्रकरणी ‘आ बैल मुझे मार’अशी अवस्था; वातावरण बिघडताच संजय राऊत स्पष्टच बोलले

Feb 16, 2026 | 12:23 PM
वडिलांकडे मुलीचा ताबा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार; वडिलांची याचिका फेटाळली

वडिलांकडे मुलीचा ताबा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार; वडिलांची याचिका फेटाळली

Feb 16, 2026 | 12:20 PM
सोफी डिवाइनच्या निवृतीनंतर न्यूझीलंड महिला संघाची कमान या अष्टपैलूकडे! हि खेळाडू करणार टीमचे नेतृत्व

सोफी डिवाइनच्या निवृतीनंतर न्यूझीलंड महिला संघाची कमान या अष्टपैलूकडे! हि खेळाडू करणार टीमचे नेतृत्व

Feb 16, 2026 | 12:17 PM
Jalgaon Accident: जळगावमध्ये भीषण अपघात, अर्टिका कारचा चेंदामेंदा; दोघांचा जागीच मृत्यू तर…

Jalgaon Accident: जळगावमध्ये भीषण अपघात, अर्टिका कारचा चेंदामेंदा; दोघांचा जागीच मृत्यू तर…

Feb 16, 2026 | 12:07 PM
Nuclear Talks : इराणच्या अडचणीत मोठी वाढ! नेतन्याहूंचा अमेरिकेला ‘हा’ गंभीर इशारा, अणु कराराचे समीकरण बदलणार?

Nuclear Talks : इराणच्या अडचणीत मोठी वाढ! नेतन्याहूंचा अमेरिकेला ‘हा’ गंभीर इशारा, अणु कराराचे समीकरण बदलणार?

Feb 16, 2026 | 12:06 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.