CM Mamata Banerjee decision Waqf Board Amendment Bill not be implemented in West Bengal
पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस (TMC) अध्यक्षा ममता बॅनर्जी महाराष्ट्रातील 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचा दौरा करणार आहेत. त त्यांच्या या भेटीकडे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होऊ लागल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनसार, ममता बॅनर्जी आज (12 जुलै 2024) उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईत दाखल होत आहेत.”लग्नाच्या आधी मी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार आहे. बऱ्याच दिवसांनी भेटणार असल्याने त्यांच्याशी राजकीय चर्चा होईल. त्यानंतर मी शरद पवारांना त्यांच्या निवासस्थानी भेटेन.” अशी माहिती ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. त्यासोबतच, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हेदेखील मुंबईत असतील आणि शक्य झाले तर मी त्यांचीही भेट घेईल, असेबी ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे, 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ममता बॅनर्जी या पहिल्यांदाच विरोधी पक्षातील अध्यक्षांची भेट घेणार आहेत. या भेटीत ममता बॅनर्जीं, राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि सपाचे अखिलेश यादव यांच्याशी देशाच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करु शकतात, अशी माहिती आहे.
यापूर्वी गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीपूर्वी इंडिया ब्लॉकच्या नेत्यांची मुंबईत बैठक झाली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनीही बैठकीला हजेरी लावली. लोकसभा निवडणुकीदरम्यान ममता बॅनर्जी यांची भारत आघाडीबाबतची भूमिका वारंवार बदलत राहिली. नंतर, आला इंडिया आघाडीला पूर्ण पाठिंबा असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. पण पश्चिम बंगालमध्ये त्यांनी एकट्याने निवडणूक लढवली होती. तर उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांनी त्यांच्या वाट्याची एक जागा तृणमूल काँग्रेसला दिली होती. पण त्यांच्या या दौऱ्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव या दोघांनीही आपापल्या राज्यातील निवडणुकीत जबरदस्त कामगिरी पाहिली आहे. पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जी आणि उत्तर प्रदेशातून अखिलेश यादव महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने उभे राहणे भाजपसाठी अडचणी निर्माण करू शकतात. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि सत्ताधारी महायुती या राजकीय पक्षांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही.