Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनंत चतुर्थीला ३ हजार ४६० गणपती बाप्पाला गणेशभक्तांचा भावपूर्ण निरोप 

10 दिवसांचा पाहुणचार स्वीकारल्यानंतर लाडका बाप्पा आता सर्वांचा निरोप घेत पुढच्या प्रवासासाठी निघाला. वसई विरार शहरातील ३ हजार ४६० गणेश मूर्तींचे विसर्जन थाटामाटात आणि भावपुर्ण वातावरणात करण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 18, 2024 | 04:28 PM
अनंत चतुर्थीला ३ हजार ४६० गणपती बाप्पाला गणेशभक्तांचा भावपूर्ण निरोप

अनंत चतुर्थीला ३ हजार ४६० गणपती बाप्पाला गणेशभक्तांचा भावपूर्ण निरोप

Follow Us
Close
Follow Us:
रवींद्र माने, वसई : मंगळवारी अनंत चतुर्थीच्या दिवशी वसई विरार शहरातील ३ हजार ४६० गणेश मूर्तींचे विसर्जन थाटामाटात आणि भावपुर्ण वातावरणात करण्यात आले. महापालिकेच्या उत्तम नियोजन आणि पोलीसांच्या चोख बंदोबस्ताला,अग्निशमन आणि नागरीक संरक्षण दलाची साथ लाभल्यामुळे आल्हाद दायक वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात आला.
यामध्ये १ हजार ६३३ गणेशाचे कृत्रिम तलावात विसर्जन झाले. यात १ हजार ५५८ घरगुती आणि ७५ सार्वजनिक गणेश मूर्तींचा समावेश होता. तर १ हजार ८२७ मूर्तींचे विसर्जन हे नैसर्गिक तलाव, खाडी आणि समुद्रात झाले. अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनासाठी पालिकेने साडेतीन हजारांहून अधिक मनुष्यबळ तैनात केले होते. नागरिकांना  विसर्जनाचे स्थळांची माहिती सहज मिळावी यासाठी जिओ टॅग लोकेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी महापालिकेने ३ ठिकाणी जेट्टीच्या ठिकाणी विशेष तयारी बरोबर बोटी आणि तराफे दिले होते.निर्माल्य तलवात आणि नदीत विसर्जित करू नये यासाठी जागोजागी निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते.
तसेच समुद्र किनारी विसर्जनस्थळी लाईफ जॅकेट,रिंग,गळ,बोट,मेगा फोन,दोरी अशा रेस्क्यू साहित्यासह अग्निशमन पथकही सज्ज ठेवण्यात आले होती. यासह जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. विसर्जन ठिकाणी घडणाऱ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. या सर्व ठिकाणी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे दोन्ही अतिरिक्त आयुक्त,सर्व उपायुक्त,प्रभागातील सहाय्यक आयुक्त यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध होते.विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान एखादी दुर्घटना घडल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार मिळावे यासाठी वैद्यकीय आरोग्य विभागाकडून प्रभाग निहाय आरोग्य पथके ही विसर्जन स्थळी नियुक्त करण्यात आली होती.याशिवाय १५ रुग्णवाहिका आणि जागोजागी फिरत्या शौचालयाचीं सोय उपलब्ध करून देण्यात आली होती.

कृत्रिम तलावात ५८.९१ टक्के विसर्जन

गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने व्हावा यासाठी पालिकेने विसर्जनासाठी  ५८ ठिकाणी १०५ कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती.तर २ बंद असलेल्या दगड खाणींच्या ठिकाणी कन्वेअर बेल्टची सुविधा उपलब्ध करून दिली होती.गणेशभक्तांनी महापालिकेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद दिला.एकूण १० दिवसांच्या काळात दीड दिवसीय,पाच दिवसीय,गौरी-गणपती,सात दिवसीय आणि अनंत चतुर्दशी या विसर्जनाला ३३ हजार ७०१ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले,यात १९ हजार ८५३ मूर्ती या कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आल्या.दहा दिवासात एकूण विसर्जनाच्या ५८.९१ टक्के विसर्जन हे कृत्रिम तलावात झाले.

Web Title: Anant chaturthi 3 thousand 460 ganesha devotees sent a heartfelt message to ganpati bappa visarjan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2024 | 04:28 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • Ganeshotsav

संबंधित बातम्या

Raigad : अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मुगवलीच्या स्वयंभू गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
1

Raigad : अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मुगवलीच्या स्वयंभू गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.