'शक्ती कायदा' अमलात आणणार तरी कधी?; अनिल देशमुख यांचा सवाल
मुंबई: तीन वर्षांपूर्वी माझ्यावर जे आरोप लावण्यात आले, त्या आरोपांची चौकशी करण्यासाठी जस्टीस चांदीवाल यांची नियुक्ती करण्यात आली होती. या जस्टीस चांदीवाल यांनी केलेल्या चौकशीचा अहवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीसांनी जनतेसमोर मांडावा, असे म्हणत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खुले आव्हान दिले आहे. आज सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी फडणवीसांना आव्हान दिले आहे. याचवेळी त्यांनी जस्टीस चांदीवास समितीच्या चौकशीचेे आणि त्यावेळचे वर्तमानपत्रातील कात्रणेही त्यांनी माध्यमांना दाखवली.
यावेळी बोलताना अनिल देशमुख म्हणाले, ‘माझ्यावर आरोप करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना एका दहशवादी, गुन्हेगाराचा वापर करावा लागतोय ही आश्चर्याची गोष्ट आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला माझ्यावर आरोप करायला लावायचे. तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनीच सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांना माझ्यावर आरोप करायला लावले होते. फडणवीसांच्या सांगण्यानुसार तीन वर्षांपूर्वी माझ्यावर आरोप केले होते तेव्हा मी स्वत:च माझ्यावरच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली होती.
त्यावेळच्या सरकारने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश चांदीवाल यांनी त्या प्रकरणाची 11 महिने चौकशी केली. 11 महिने चौकशी केल्यानंतर 2022 मध्येच माझ्यावरील आरोपांचा चौकशीचा अहवाल चांदीवाल यांनी गृहमंत्रालयाकडे दिला आहे. आता फडणवीसांनी जस्टीस चांदीवाल यांनी जो अहवाल सादर केला तो अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर आणावा, अशी मागणी मी गेल्या काही दिवसांपासून करत आहे. 1400 पानांचा तो अहवाल आहे. मी मागणी करूनही राज्य सरकार तो अहवाल जनतेसमोर आणत नाही. आताही माझी विनंती आहे की सरकारने लवकरात लवकर तो अहवाल जनतेसमोर आणावा, असे अनिल देशमुखांनी म्हटले आहे.
तसेच, अनिल देशमुख म्हणाले, ‘सचिन वाझे ज्यावेळी जस्टीस चांदीवाल यांच्या समोर हजर झाले. त्यावेळी त्यांनी अनिल देशमुख किंवा त्यांच्या पीए ने तुमच्याकडे पैसे मागितले का, असा असा सवाल विचारला. त्यावेळी अनिल देशमुख किंवात्यांच्या पीएने माझ्याकडे कोणतेही पैसे मागितले नाहीत असा जबाब दिला होता. असे सांगत अनिल देशमुख यांनी जस्टीस चांदीवाल यांच्या सुनावणी वेळी झालेला रोजनामा ( मिनिट्स) सादर केला. पण देवेद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून सचिन वाझे पुन्हा आरोप करत असतील तर माझ्याबद्दल झालेल्या चौकशीचा अहवाल सादर करावा, अशी मी मागणी करत आहे.
दोन खूनाच्या हत्येचा आरोपाखाली सचिन वाझे तुरुंगात आहेत आणि माझ्या विरोधात बोलण्यासाठी ते अशा गुन्हेगार माणसाचा वापर करत आहेत. सचिन वाझे ने जस्टीस चादीवाल यांच्या कोर्टात जो जबाब दिला होता. तेव्हा वाझे नेच सांगितले होते की अनिल देशमुख किंवा त्यांच्या कोणत्याही माणसाने माझ्याकडे पैसे मागितले नाहीत, किंवा बाहेरच्या लोकांकडूनही पैसे वसूल करण्यास सांगितले नाहीत. सचिन वाझेने स्वत: हे स्टेटमेंट दिले आहे. हे सांगत असताना त्यांनी त्यावेळच्या वर्तमानपत्रातील बातम्यांची कात्रणेही त्यांनी दाखवली.