मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकांचे काऊंटडाऊन सुरू झाले. मुंबईतील वातावरणही तापू लागले आहे. मुंबई काबीज कऱण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीत चुरशीची लढत होणार आहे. महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या गटाला मुंबईतील 36 विधानसभेच्या जागांपैकी 22 जागा मिळाल्या आहेत. यातील किती जागांवर विजय होणार हे तर निकालाच्या दिवशीच कळणार आहे. पण ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मुंबईबाबत मोठा दावा केला आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गट मुंबईतील 36 पैकी 22 विधानसभा जागा लढवत आहे. त्यातील किमान 15 जागा आम्ही जिंकू असा दावा अनिल परब यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मात्र मुंबईतील लढाई कठीण जाण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महायुतीच्या उमेदवारांना फटका बसू शकतो. वरळी, माहीम आणि वांद्रे पूर्व या प्रतिष्ठेच्या जागांवर तिरंगी लढत होईल. त्यात ठाकरे गटाचा उमेदवार नक्कीच विजयी होईल, असा दावा अनिक परब यांनी केला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. पण अनिल परब यांनी या चर्चां फेटाळून लावल्या आहेत. महाविकास आघाडीच् जागावाटपावरून कोणतेही मतभेद नसल्याचे परब यांनी म्हटले आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 30 जागा लढल्या होत्या. पण यावेळी मात्र काँग्रेस फक्त 10 जागांवरच लढत आहे. आम्ही 22 जागा लढत आहोत, पण मुंबई हा नेहमीच शिवसेनेचा (ठाकरे गटाचा) गड राहिला आहे. 2019 मध्येही मुंबईत 15 आमदार निवडून आले होते. यावेळीही आमचे किमान 15 उमेदवार जिंकतील, असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा : सहा जणांचा जागीच मृत्यू…डेहराडूनमध्ये भीषण अपघात, कंटेनरची कारला धडक
वर्सोवा विधानसभा मतदारसंगात मुस्लीम उमेदवार हारून खान यांना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. पण यामागे कुठलीही रणनीती नसल्याचेही परब यांनी म्हटले आहे. पण अल्पसंख्यांक समाजाने दाखवेले प्रेम आणि आपुलकी दाखवली. त्यांना उद्धव ठाकरे यांचे काम आणि राजकारणही आवडले. त्यांनी आम्हाला लोकसभेतही मतदान केले. आताही आम्ही शिवसैनिक असलेला उमेदवार दिला आहे. असेही अनिल परब यांनी नमुद केले.
पण मनसेही अनेक जागांवर महाविकास आघाडी आणि महायुतीच् उमेदवारांवरोधात निवडणूक लढवत आहे. मनसेमुळे भाजपची मते विभागली जातील. मराठी मतांचे विभाजप करण्यासाठी मनसे काम करेल, असाही अंदाज अनिल परब यांनी व्यक्त केला आहे. वांद्रे पूर्व, माहीम आणि वरळी या जागा अत्यंत प्रतिष्ठेचा मानल्या जातात. याठिकाणी तिंरगी लढत होऊ शकते. पण लोकसभा निवडणुकीत या जागांवर महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. पण आलेल्या अनुभवात सुधारणा करण्यात आल्याचेही परब यांनी म्हटले आहे.