File Photo : Dilip Mohite
मंचर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मला विचारले ‘दिलीप वळसे पाटील यांचे काय चालले आहे? यावर मी म्हणालो ‘जयंतराव, दिलीप वळसे पाटील हे 100 टक्के मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. माझे मन साफ आहे. माझ्या मनात तेच ओठावर आहे. वळसे पाटलांची जागा मोठ्या मताधिक्क्यानेच निवडून येणार’ असे सांगून माजी खासदार, म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जयंत पाटील यांच्याबरोबर झालेल्या बंद दरवाजातील चर्चेला पूर्णविराम दिला.
हेदेखील वाचा : Todays Gold Price: सोनं खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी; सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा तुमच्या शहरातील दर
पाबळ भोरशेत (ता. शिरूर ) येथे आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या कोपरा सभेत माजी खासदार आढळराव यांनी हा किस्सा सांगितला. याप्रसंगी महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील, माजी सभापती प्रकाश पवार, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सविता बगाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिवाजीराव आढळराव पाटील पुढे म्हणाले, ‘निवडणुकीत मतदान करताना पुढील पाच वर्षाचा आभारी आणि विचार करताना गेल्या पंधरा वर्षांचा देखील विचार करा. पाबळ, धामारी, खैरनगर परिसरात दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लागली आहेत. मी देखील दहा-वीस लाख रुपयांची अनेक कामे मार्गी लावली आहेत. आता फुटाणवाडी येथे सभागृहासाठी ४० लाख रुपयांचा निधी आपण आणला आहे. आपल्या भागातून विधानसभेसाठी वळसे पाटील यांनाच मतदान करावे’, असेही आवाहन आढळराव यांनी केले .
महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यावेळी म्हणाले, ‘माझ्या दृष्टीने पाणी हा महत्त्वाचा विषय आहे. भविष्यात पाणी प्रश्न पेटणार आहे. आंबेगाव शिरूर तालुकावासियांच्या हक्काचे असणाऱ्या डिंभे (हुतात्मा बाबू गेणू जलसागर) धरणातील पाणी बोगदा पाडून पळवून नेण्याचा काहींचा डाव आहे.
बोगद्याला स्थगिती आणून जिंकली निम्मी लढाई
याविषयी आपण बोगद्याला स्थगिती आणून अर्धी लढाई जिंकली आहे. पुढील पाच वर्षे आपण पाण्यासाठीच लढा देणार आहोत. शिरूर तालुक्यातील 14 गावांचा पाणी प्रश्न प्राधान्याने सोडायला जाणार असल्याची माहिती वळसे पाटील यांनी दिली.
हेदेखील वाचा- Todays Gold Price: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोनं आणि चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण