Anjali Damania claims woman questioned in the Santosh Deshmukh case was murdered in Kalamb
बीड : राज्यामध्ये मागील चार महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. डिसेंबर महिन्यामध्ये देशमुख यांची हत्या करण्यात आली. यामुळे बीडसह राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला. या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला मुख्य आरोपी म्हणून आरोप करण्यात आले आहेत. यातील कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे. या प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. आता अंजली दमानिया यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची कळंब शहरात हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन वाल्मिक कराड आणि बीडचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले होते. अनेक फोटो, व्हिडिओ आणि कागदपत्रे त्यांनी पुरावे म्हणून सादर केले आहेत. आता त्यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. या प्रकरणामध्ये चौकशी करण्यात आलेल्या एका महिलेची हत्या करण्यात आल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, गुड संपता संपत नाही आणि हत्या संपता संपत नाहीत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची कळंब शहरात हत्या? संतोष देशमुखावर अनैतिक आरोप करण्यासाठी तयार आसलेली कळंब शहरातील द्वारका नगरमध्ये राहत आसलेल्या महिलेची हत्या झाल्याचे कळत आहे. या महिलेची ७ ते ८ दिवसांपूर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी लिहिले आहे की, “कुठल्या कारणाने हत्या झाली अन बीड पोलीसांना ही बातमी कळाली अन् ते घटना स्थळी पोहचल्यावर नंतरच तेथील रहिवासी व स्थानिक पोलीसांना कळाली व अजून याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की अनैतीक संबधातून हत्या झाली अशी चर्चा सध्या सुरू आहे”
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करीत आहेत. असं असलं तरी शहर आणि परिसरात या घटनेने दहशत पसरली आहे. शहरातील द्वारका नगरीत राहणाऱ्या लोकांना दोन दिवसांपासून उग्र वास येत होता. पण ज्या घरातून वास येत होता त्या घराला बाहेरून कुलूप लावलेले होते. दरवाजा तोडून बीड पोलीस व स्थानिक पोलीसांनी आत प्रवेश केल्यानंतर संबंधित महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना आढळला. व मृतदेह सडलेला असल्यामुळे जागेवरच मृतदेहाचे पोस्टमार्टम केले व अंत्यविधी ही उरकला या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.”
गुड संपता संपत नाही आणि हत्या संपता संपत नाहीत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची कळंब शहरात हत्या ?
संतोष देशमुखावर अनैतीक आरोप करण्यासाठी तयार आसलेली कळंब शहरातील द्वारका नगर मधे राहत आसलेल्या महिलेची हत्या झाल्याचे कळतय.
या महिलेची ७ ते ८ दिवसापुर्वी…
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) March 31, 2025
ही महिला अनेक पुरुषांना अडकवण्याचे काम करायची आणि त्यासाठी ती खाली दिलेल्या नावांचा वापर करायची मनीषा आकुसकर (आडस), मनीषा बिडवे (कळंब), मनीषा मनोज बियाणी (कळंब), मनीषा राम उपाडे (अंबाजोगाई) आणि मनीषा संजय गोंदवले (रत्नागिरी) या नावांचा वापर सदर महिला करत असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.