सुरेश धस यांनी शिवराज दिवटे मारहाण प्रकरणावरुन बीडमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला (फोटो - सोशल मीडिया)
बीड : बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे एकच खळबळ उडाली होती. सध्या हे प्रकरणाची केस न्यायालयामध्ये सुरु आहे. या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा प्रमुख आरोपी आहे. मात्र त्याच्या तुरुंगामध्ये हल्ला करण्यात आला आहे. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले दोघांना देखी तुरुंगात मारहाण करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणावर भाजप नेते व आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजप आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वाल्मिक कराडला झालेल्या मारहाणी मागील गोष्ट सांगितली आहे. वाल्मिक कराडला मारहाण केलेल्या आरोपींची नावे अक्षय आठवले आणि महादेव गिते अशी सांगितली जात आहेत. या मारहाणीबाबत आमदार सुरेश धस म्हणाले की, मला या प्रकरणाची माहिती आहे. महादेव गिते आणि अक्षय आठवले यांनी ही मारहाण केलेली आहे, असा दुजोरा सुरेश धस यांनी दिला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मारहाण प्रकरणी आमदार सुरेश धस यांनी अंदर की बात सांगितली आहे. आमदार धस म्हणाले की, महादेव गिते याला अटक होण्यापूर्वी एक व्हिडीओ व्हायरल केलेला आहे. मला खोट्या गुन्ह्यात कसं गुंतवलं हे सांगून मग तो जेलमध्ये गेला आहे. इतरांना खोट्या गुन्ह्यात अडकवायचं, कोणाला खोट्या प्रकरणात अडकवायचं, अशा सर्व प्रकरणामुळे त्यांना मारहाण झाली असेल. त्यांच्यात झटापट झाली. फक्त मारहाण झालेली आहे. कोणत्याही वस्तूने मारण्यात आलेले नाही, असे स्पष्ट मत आमदार सुरेश धस यांनी मांडले आहे.
पुढे ते म्हणाले की, “वाल्मिक कराडला रुग्णालयात दाखल करणार नाही. त्याला फक्त दोन कानशिलात लगावण्यात आल्या आहेत. बापू आंधळे प्रकरणामध्ये महादेव गिते याला अडकवण्यात आले आहे. मात्र त्याने त्याचा या प्रकरणामध्ये काहीही संबंध नसल्याचे सांगितले आहे. विनाकारण मला यामध्ये अडकवण्यात आले आहे. यासाठी घटनेची वेळ देखील बदलण्यात आली. घटना ८.३० ला झाली आणि तक्रार करताना ७ ची वेळ दाखवली. ते केल्याशिवाय बबन गिते यात अडकत नव्हता, असा दावा आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बीडमधील कायदा व सुव्यवस्थेवरुन अनेकदा प्रश्न निर्माण केले जात आहेत. याबाबत आमदार सुरेश धस म्हणाले की, बीडच्या जेलमध्ये काहीही होऊ शकतं. माझी माहिती अशी आहे की आकाला स्पेशल जेवणही पुरवलं जातं. स्पेशल कोणता तरी फोन आहे, ज्या फोनवरून आकाचं डायरेक्ट कनेक्शन परळीतल्या एका फोनवर होतं. मागील काही दिवसांपासून बीडच्या तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट झालेल्या आहेत. हे वर्तमानपत्रातून बाहेर आल्यानंतर त्याला सस्पेंड केलं पण व्हिजिट का नाही केली? या संपूर्ण प्रकरणात एसपींनी वचक ठेवायला हवा होता, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली आहे.