Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anjali Damania : ‘हे घ्या धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराड यांचे पुरावे’; दमानियांनी शेअर केले मुंडेंचे हातात पिस्तुल घेतलेले Video

बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणावरून गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया पोस्ट शेअर करत आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Dec 26, 2024 | 07:21 PM
'हे घ्या धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराड यांचे पुरावे'; दमानियांनी शेअर केले मुंडेंचे हातात पिस्तुल घेतलेले Video

'हे घ्या धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराड यांचे पुरावे'; दमानियांनी शेअर केले मुंडेंचे हातात पिस्तुल घेतलेले Video

Follow Us
Close
Follow Us:

बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणावरून सध्या राजकारणही तापलं आहे. त्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया बीडच्या मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरणावरून सातत्याने पोस्ट करत आहेत. या पोस्टमध्ये वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याचा आरोप सातत्याने करत आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एका जमिनीवर सयुक्त मालकी असल्याची कागदपत्र शेअर केली होती. तर आज धनंजय मुंडेंच्या हातात पिस्तुल असल्याचे व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामुळे खळबळ माजली आहे.

हे असले बॉस ? इनेटाग्राम वर अशी reels दाखवल्यावर नवी पिढी ह्यातून काय प्रेरणा घेणार ? कष्ट न करता पिस्तुल दाखवून पैसे कमावणे सोपे असेच त्यांना वाटते. आपला देश असा असणार आहे का ? हे देशाबद्दल vision असणार आहे का ? ताबडतोब बीड मधील सगळ्या शास्त्र परवान्यांवर चौकशी लावा. गरज… pic.twitter.com/bQGa71D79D — Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 26, 2024

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे विधिमंडळ अधिवेशनात पडसाद उमटले. गुन्हेगारांना कठोर शिक्षा केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. मात्र, या प्रकरणातील वाल्मिक कराड याला मंत्री धनंजय मुंडे यांचं संरक्षण असल्याचा गंभीर आरोप विरोधकांकडून केला जात आहे. असाच दावा अंजली दमानिया यांनीही केला असून धनंजय मुंडेंचे वाल्मिक कराडशी व्यावसायिक संबंध असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन ! हे घ्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक सख्य किती आहे याचे धडधडीत पुरावे. कंपनी एकत्र, जमीन एकत्र जगमित्र शुगर्स चे ६ सातबारे मी डिजिटली डाउनलोड केले ३५५४ गुंठे जमीन (८८ एकर ३४ गुंठे) pic.twitter.com/afpORBwTRh — Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 23, 2024

अंजली दमानिया यांनी २३ डिसेंबर रोजी आपल्या एक्स अकाऊंटवर या संपूर्ण प्रकरणाबाबत मोठा दावा करणारी काही कागदपत्र शेअर केली आहेत. त्यात जगमित्र शुगर्सचे ६ सातबारे असून त्यात धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांची संयुक्त मालकी असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांनी शेअर केलेल्या सातबाऱ्यांमध्येही इतर काही नावांसोबत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचीही आहेत.

त्यानंतर आज अंजली दमानिया यांनी पुन्हा एक्स अकाऊंटवरून आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये दोन इन्स्टाग्राम रील आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांचा हातात पिस्तुल असलेला एक फोटो एका रीलमध्ये आहे. दुसऱ्या रीलमध्ये धनंजय मुंडे एका कारमध्ये बसल्याचं दिसत आहे.

“हे असले बॉस? इन्स्टाग्रामवर अशा रील्स दाखवल्यावर नवी पिढी यातून काय प्रेरणा घेणार? कष्ट न करता पिस्तुल दाखवून पैसे कमावणं सोपं असंच त्यांना वाटतं. आपला देश असा असणार आहे का? देशाबद्दल हे व्हिजन असणार आहे का? ताबडतोब बीडमधील सगळ्या शस्त्र परवान्यांची चौकशी लावा. गरजेचे नसलेले परवाने रद्द करा”, अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या

Web Title: Anjali damania share dhananjay munde video with valmik karad allegation in santosh deshmukh case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2024 | 06:35 PM

Topics:  

  • dhananjay munde
  • Santosh Deshmukh Case

संबंधित बातम्या

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर
1

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

माझ्या विरोधात कोर्टात गेले, पण…; धनंजय मुंडेंनी मनातील खदखद केली व्यक्त
2

माझ्या विरोधात कोर्टात गेले, पण…; धनंजय मुंडेंनी मनातील खदखद केली व्यक्त

मोठी बातमी ! पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर; चर्चांना उधाण
3

मोठी बातमी ! पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर; चर्चांना उधाण

Maharashtra Politics : धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ मागणीवर अजित पवार सकारात्मक; मोठा निर्णय घेणार?
4

Maharashtra Politics : धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ मागणीवर अजित पवार सकारात्मक; मोठा निर्णय घेणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.