मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Former Mumbai Police Commissioner Parambir Singh) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अनुप डांगे (Anup Dange) यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर चौकशी करिता हजर राहण्यासाठी समन्स पाठवले होते. त्यानुसार ते आज हजर झाले. त्यांनी अनुप डांगे यांच्या कडून लाच घेतली नसल्याचे सांगत हे सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.
पबवर केलेल्या कारवाईच्या रागात परमबीर (Parambir Singh) यांनी आपले निलंबन केल्याचा आरोप करत, गावदेवी पोलीस ठाण्यातील (Gamdevi Police Station) पोलीस निरीक्षक अनुप डांगे (PI Anup Dange) यांनी अतिरिक्त गृह सचिवांकड़े तक्रार केल्याचे पत्र व्हायरल झाले होते. यात, निलंबन न करण्यासाठी ५० लाख तर निलंबनानंतर पुन्हा सेवेत घेण्यासाठी परमबीर यांच्या नावे २ कोटींची मागणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणाची गेली वर्षभर चौकशी सुरू आहे.
[read_also content=”तुमच्या ‘या’ चुकांमुळे केस तुटतात आणि झपाट्याने गळतात, तज्ज्ञांनी सांगितले ते टाळण्यासाठी उपाय; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/lifestyle/common-mistakes-that-can-cause-hair-fall-and-breakage-dermatologist-shares-know-the-details-in-marathi-231567.html”]
मात्र त्यात काही निकाल न लागल्यामुळे अनुप डांगे यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. आता या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणात मुंबई चे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिह यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ११ जानेवारी रोजी समन्स पाठवून चौकशी करता हजर राहण्यास सांगण्यात आले होते. परंतु कोविडच्या प्रादुर्भावाचे कारण देत त्यांनी वकिलांमार्फत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे पत्र व्यवहार करून दोन आठवड्याचा वेळ मागून घेतला होता. त्यानुसार ते आज मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात उपस्थित राहिले. चौकशीत त्यांनी अनुप डांगे यांच्या कडून लाच घेतली नसल्याचे सांगत हे सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.
[read_also content=”‘या’ ठिकाणांना भेट देण्यासाठी भारतीयांना केवळ परदेशातच नाही तर भारतातही घ्यावा लागतो व्हिसा https://www.navarashtra.com/lifestyle/travel-tips-to-visit-these-places-indians-need-a-inner-line-permit-also-in-india-nrvb-231323.html”]