Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणरेल्वे प्रवाशांच्या सोयी सुविधा परराज्यात, सिंधुदुर्गमध्ये लक्षवेधी प्रवासी संघटना एकवटल्या

कोकणवासीयांसाठी रेल्वे आणि फायदा मात्र पर राज्यांसाठी सिंधुदुर्गातील आणि कोकणातील प्रवाशांच्या सोयी सुविधा आणि होणारी गैरसोय लक्षात घेऊन प्रत्येक रेल्वे स्टेशन परिसरातील प्रवासी संघटना स्थापन होऊ लागल्या

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 15, 2024 | 11:25 AM
कोकणरेल्वे प्रवाशांच्या सोयी सुविधा परराज्यात, सिंधुदुर्गमध्ये लक्षवेधी प्रवासी संघटना एकवटल्या
Follow Us
Close
Follow Us:

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेच्या प्रश्नासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवासी संघटना एकवटल्या आहेत. सावंतवाडीत हक्काचे टर्मिनल सिंधुदुर्ग स्टेशनवर एलटीटी, नागपूर, पुणे, जनशताब्दी, नेत्रावतीसह जलद गाड्या थांबा घेत नाही. तसेच स्वतंत्र तिकीट कोटा, मार्केट यार्डसाठी रो रो प्लॅटफॉर्म, स्वतंत्र बोगी रेल्वे विभागीय उप कार्यालय यांसारख्या विविध मागण्यांसह रेल्वेच्या समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी प्रवासी संघटना कार्यरत राहणार असून प्रवाशांच्या समस्यासाठी एकवटली आहे.

कोकण रेल्वे प्रवासी संघटना सिंधुदुर्ग या नावाने सिंधुदुर्गनगरी पंचक्रोशीतील प्रवासी संघटना स्थापन करण्यासाठी एक समन्वय समिती बैठक रानबांबुळी ग्रामपंचायत येथे नंदन वेंगुर्लेकर, रानबांबुळी सरपंच परशुराम परब, कसाल सरपंच राजन परब, सागर तळवडेकर, उपसरपंच सुभाष बांबुळकर, साईआंबेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली, यावेळी या परिसरातील प्रमुख पदाधिकारी रेल्वे प्रेमी प्रवासी उपस्थित होते.

कोकण रेल्वे ही कोकण वासियांसाठी महत्त्वाची रेल्वे असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग सह स्टेशनवर जलद गाड्यांना थांबा, तिकीट कोटा, सोयी सुविधा यासह प्रश्नांसाठी लक्षवेधी संघटना निर्माण करण्यासाठी या बैठकीत सादर चर्चा झाली. कोकण रेल्वेच्या या मार्गावर सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवर कोकणकन्या , मांडवी , दादर सावंतवाडी , दिवा पॅसेंजर आदी गाड्यांना थांबा आहे तर काही ठराविक दिवशी येणाऱ्या एक दोन गाड्या ना थांबा मिळतो सिंधुदुर्ग या स्टेशनवर एलटीटी मडगांव , नागपूर मडगाव , पुणे यासह जनशताब्दी , नेत्रावती सारख्या गाड्यांना थांबा मिळावा येथील जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या या रेल्वे स्टेशनवर प्रवासी आणि अधिकारी कर्मचाऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन जलद गाड्यांना थांबा मिळावा

सावंतवाडी येथे गेले अनेक वर्षे सुरू असलेले टर्मिनलचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे सावंतवाडी टर्मिनलवरून काही गाड्या सुटू शकतात. त्याचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या दहा स्टेशनवर होऊ शकतो. सावंतवाडी दादर शिवाजी टर्मिनल स्वतंत्र गाडी सोडावी, पीआरएस तिकीट कोठा सिस्टीम सुरू करावी, कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते यांचा फोटो स्टेशनवर लावावा येथील निवारा शेड संख्या वाढवावी. त्याचबरोबर पलीकडच्या पश्चिम बाजूने रेल्वे प्रवाशांसाठी स्वतंत्र रस्ता व्हावा, महिला आणि पुरुषांसाठी सुलभ सौचालय सुविधा संख्या वाढवावी. दिवा पॅसेंजरप्रमाणे रात्रीच्या वेळी मडूरा सावंतवाडी दादर या शहरांसाठी नवीन गाडी सुरू करावी. रेल्वे स्टेशनसाठी रानबांबुळी गावाचे नाव असावे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १५ रेल्वे गाड्या मडगाव, केरळ व अन्य ठिकाणी थांबतात.

सिंधुदुर्गात एकही थांबा नाही त्यामुळे १० गाड्यांना एक दुसरा ठराविक थांबा सिंधुदुर्गात असावा. कोकणवासीयांसाठी रेल्वे आणि फायदा मात्र पर राज्यांसाठी सिंधुदुर्गातील आणि कोकणातील प्रवाशांच्या सोयी सुविधा आणि होणारी गैरसोय लक्षात घेऊन प्रत्येक रेल्वे स्टेशन परिसरातील प्रवासी संघटना स्थापन होऊ लागल्या असून सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन परिसरातील ही प्रवासी संघटना कार्यरत होत आहे. येत्या दोन दिवसात याबाबत संघटना कार्यरत बैठक होऊन याबाबतचे निवेदन देण्याबाबतचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. कोकण रेल्वे वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या चार तालुक्यातून जाते उर्वरित तालुक्यातूनही रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांना सामावून घेण्याचे ही या बैठकीत ठरले आहे.

कोकण रेल्वे या नावाने रेल्वे सुरू आहे. परंतु सिंधुदुर्ग आणि कोकणातील या अन्य जिल्ह्यातील प्रवाशांच्या समस्यांकडे कोकण रेल्वे दुर्लक्ष करत आहे. ज्या गोवा, केरळ, कर्नाटक व अन्य भागातील रेल्वे प्रवाशांना सोयी सुविधा मिळतात. रेल्वेच्या अनेक सोयी सुविधांचा योजनांचा फायदा घेतात. त्याप्रमाणे सिंधुदुर्गातील रेल्वे प्रवाशांच्या गैरसोयी अधिक वाढत चालल्या आहेत. यावर लक्ष देण्यासाठी ही प्रवासी संघटना अधिक प्रकर्षाने काम करणार असल्याचे यावेळी नंदन वेंगुर्लेकर यांनी सांगितले. सावंतवाडी टर्मिनल प्रवासी संघटनेचे सागर तळवडेकर यांनी कोकण रेल्वेच्या अनेक समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांची संघटना संघटित होणे आणि समस्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १५ रेल्वे थांबतच नाहीत यास प्रश्नांवर लक्ष वेधला त्यामुळे आपण संघटित होऊ या उद्याच्या या होणाऱ्या बैठकीत सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.

Web Title: Apart from the convenience of konkan railway passengers notable passenger organizations have gathered in sindhudurg mahararshtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2024 | 11:25 AM

Topics:  

  • CSMT
  • kokan
  • konkan railway

संबंधित बातम्या

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी सुटणार ‘या’ दोन खास ट्रेन, राणे कुटुंबाचा पुढाकार
1

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी सुटणार ‘या’ दोन खास ट्रेन, राणे कुटुंबाचा पुढाकार

श्वानांना खरंच भुतं दिसतात का? काय आहे यामागचं रहस्य? जाणून घ्या
2

श्वानांना खरंच भुतं दिसतात का? काय आहे यामागचं रहस्य? जाणून घ्या

Ganpati Special Trains 2025: आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी आणखी ४६ विशेष गाड्या धावणार, मध्य-कोकण रेल्वेने केले जाहीर
3

Ganpati Special Trains 2025: आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी आणखी ४६ विशेष गाड्या धावणार, मध्य-कोकण रेल्वेने केले जाहीर

Konkan Railway : सिंधुदुर्गात लांबच्या पल्ल्यांना थांबा मिळालाच पाहिजे; रेल्वे प्रवाशी संघटनेच्या जन आंदोलनाला उत्फुद प्रतिसाद
4

Konkan Railway : सिंधुदुर्गात लांबच्या पल्ल्यांना थांबा मिळालाच पाहिजे; रेल्वे प्रवाशी संघटनेच्या जन आंदोलनाला उत्फुद प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.