
नशेच्या अवस्थेत व्यक्ती रेल्वे ट्रॅकवरच जाऊन झोपला, समोरून ट्रेन आली अन् एकच धुमाकूळ माजला; घटनेचा थरारक Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
सोमवारी दुपारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे एक मोठा अपघात होता होता टळला. एका मद्यधुंद अवस्थेतील किशोरवयीन मुलगा प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या रुळांवर जाऊन झोपला. ही घटना दुपारी ३:२० च्या सुमारास घडली. यामुळे लोकल ट्रेन (११६९, व्ही-३६ हेडिंग) अचानक थांबावी लागली. सुदैवाने मोटरमनला त्या माणसाची उपस्थिती लक्षात आली आणि त्याने वारंवार हॉर्न वाजवून आपत्कालीन परिस्थितीचा संकेत दिला. त्यानंतर त्याने रुळांवर पडलेल्या माणसासमोरच ट्रेन थांबवण्यात आली.
उपनिरीक्षक विवेक आणि हेड कॉन्स्टेबल राजेश चित्ते परिस्थितीचा तपास करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. त्यांना रेल्वे रुळांवर एक तरुण पडलेला आढळला. नंतर त्या तरुणाची ओळख १८ वर्षीय अविनाश प्रकाश कर्डिले अशी झाली. प्राथमिक तपासात असे दिसून आले की कर्डिले हा सीएसएमटी बस स्टँडजवळील फूटपाथवर राहतो. तो कचऱ्यात पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या उचलण्यासाठी रुळांवर गेला होता परंतु जास्त प्रमाणात मद्यधुंद असल्याने त्याला तिथेच झोप लागली. दरम्यान तरुणाला यानंतर ताब्यात घेऊन अधिक चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. रेल्वे कायद्याच्या कलम १४७ अंतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Drunkards are the highest GST payers. 🤣🤣
A man in an intoxicated condition lay down on the railway tracks at Chhatrapati Shivaji Maharaj Terminus on Monday afternoon and covered himself with a cloth.
He wanted to take a nap.
The train disrupted his sleep.
Later on, he was… pic.twitter.com/OvldulcJ04 — SK Chakraborty (@sanjoychakra) February 16, 2026
दरम्यान घटनेचा व्हिडिओ @sanjoychakra नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘मी हे पहिल्यांदाच पहिले आहे’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “दारूमुळे सरकारला मोठा महसूल मिळतो! केरळमध्ये दारूपासून सर्वाधिक महसूल मिळतो! हा माणूस जिवंत राहण्यास भाग्यवान आहे! मृतदेहाला जीवदान देण्याचे त्याचे नाटक भयानक वास्तवात येऊ शकते!” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “इतके लोक उभे राहून व्हिडिओ बनवत आहेत पण त्यांना कोणी उचलत नाहीये, हा कसला समाज आहे? दारू पिणारा दारू पिलेला आहे पण हे जागरूक लोक कमी मूर्ख आहेत का?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “वेडे लोक”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.