Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑर्केस्ट्रा बारवर एपीएमसी पोलिसांची कारवाई; ८ महिला आणि ३ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमएच-43 ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी धाड टाकत ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गोपनीय माहितीनुसार बारमध्ये महिला कर्मचारी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अशोभनीय हावभाव करत असल्याचे समोर आले होते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 03, 2026 | 08:20 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

सावन वैश्य | नवी मुंबई – : एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमएच-43 ऑर्केस्ट्रा बारवर सोमवारी पोलिसांनी धाड टाकून आठ महिला आणि तीन कर्मचाऱ्यांसह एकूण 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बारमध्ये महिलांकडून अश्लील हावभाव व बिभत्स प्रकार करून ग्राहकांना आकर्षित केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच-43 बारमध्ये महिला कर्मचारी तोकडे कपडे परिधान करून ग्राहकांसमोर अश्लील हावभाव करत असल्याची गोपनीय माहिती एपीएमसी पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी सोमवारी बारवर छापा टाकला.

Gram Panchayat Gairan Lands: पुणे जिल्ह्यातील २ हजार हेक्टरहून अधिक गायरान जमिनींचा प्रश्न ऐरणीवर

कारवाईदरम्यान आठ महिला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अश्लील व बिभत्स चाळे करत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी संबंधित आठ महिलांना ताब्यात घेतले. तसेच बारमधील संतोष शेट्टी, हरेश शेट्टी आणि पंडित हरेंदर या तीन कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास एपीएमसी पोलीस करीत आहेत. पदभार स्वीकारताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांची धडाकेबाज कारवाई एपीएमसी पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी ही कारवाई केल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

Mumbai Local : हार्बर लाइन विस्ताराला वेग! बोरिवली कनेक्टिव्हिटीसाठी वेस्टर्न रेल्वेकडून टेंडर प्रक्रिया सुरू

अजय शिंदे यांच्या बदलीनंतर आबासाहेब पाटील यांनी एपीएमसी पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारला असून, पदभार घेतल्यानंतर लगेचच काही तासात एमएच-43 बारवर धाड टाकून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. एपीएमसी परिसरात अनेक लेडीज बार , स्पा आणि लॉज कार्यरत असून, काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असतात. अशा पार्श्वभूमीवर झालेली ही कारवाई बार चालकांसाठी इशारा मानली जात असून, भविष्यातही अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांकडून मिळत आहेत.

Web Title: Apmc police raid orchestra bar case registered against 8 women and 3 employees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • APMC Market
  • Crime Police

संबंधित बातम्या

Buldhana News: शेवगा फाट्यावर कारवाई, ४ लाखांचा मुद्देमाल केला जप्त; नकली नोटांसह चारजण जेरबंद
1

Buldhana News: शेवगा फाट्यावर कारवाई, ४ लाखांचा मुद्देमाल केला जप्त; नकली नोटांसह चारजण जेरबंद

सांगली बाजार समितीच्या त्रिभाजनाचा फैसला पुन्हा लांबणीवर; कोल्हापूर खंडपीठाकडून १५ दिवसांची मुदतवाढ
2

सांगली बाजार समितीच्या त्रिभाजनाचा फैसला पुन्हा लांबणीवर; कोल्हापूर खंडपीठाकडून १५ दिवसांची मुदतवाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.