Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाडक्या बहिणींनो लक्ष द्या; अर्जांची होणार सूक्ष्म छाननी, मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या…

लाभार्थी महिला राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत. या पार्श्वभूमीवर महिला आणि बालविकास विभागाने 26 लाख लाभार्थी महिला योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही, याची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू केली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 26, 2025 | 07:27 AM
२६ लाख लाडक्या बहिणींची छाननी

२६ लाख लाडक्या बहिणींची छाननी

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चांगलीच पसंतीस उतरली आहे. या योजनेंतर्गत लाखो महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. मात्र, यामध्ये अनेक बोगस नावं असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून ही नावं वगळण्याचे काम सुरु आहे. त्यातच आता या योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी 26 लाख महिलांची सूक्ष्म छाननी सुरू करण्यात आली आहे. याबाबतची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ‘एक्स’ वर पोस्ट केली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत ज्या महिला निकषानुसार पात्र ठरल्याचे दिसून येत नसल्याने ही छाननी केली जात आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यात अपात्र महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यासंदर्भात माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने जी प्राथमिक माहिती उपलब्ध करुन दिली आहे, त्यानुसार राज्यातील 26 लाख महिला पात्र नसल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, या लाभार्थी महिला राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत. या पार्श्वभूमीवर महिला आणि बालविकास विभागाने 26 लाख लाभार्थी महिला योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही, याची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू केली आहे. छाननीअंती या लाभार्थीची पात्रता-अपात्रता स्पष्ट होणार आहे. छाननीअंती जे लाभार्थी अपात्र ठरतील, त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल, असे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

काय म्हटलंय पोस्टमध्ये?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी सुमारे 26 लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करुन दिली होती. सदर सुमारे 26 लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत. त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी (Physical Verification) उपलब्ध करुन दिलेली आहे.

त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सुक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरु आहे. छाननीअंती या लाभार्थींची पात्रता/अपात्रता स्पष्ट होणार आहे. छाननीअंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल, तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ यापुढेही पुवर्वत सुरु राहील, असे ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

Web Title: Applications for the ladki bahin yojana will be scrutinized closely says minister aditi tatkare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 07:21 AM

Topics:  

  • Aaditi Tatkare
  • Ladki Bahin Yojana
  • Maharashtra Government Scheme
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Solapur News: देवस्थान की रंगमंच? कुंभारीच्या गेनसिद्ध महाराज मंदिरातील ‘त्या’ नृत्याचा व्हिडिओ व्हायरल; भाविकांमध्ये तीव्र संताप
1

Solapur News: देवस्थान की रंगमंच? कुंभारीच्या गेनसिद्ध महाराज मंदिरातील ‘त्या’ नृत्याचा व्हिडिओ व्हायरल; भाविकांमध्ये तीव्र संताप

राज्यासाठी धोक्याची घंटा! एका वर्षात जन्मलिंग गुणोत्तर 912 वरून 897 वर; आरोग्य विभागाच्या अहवालाने चिंता वाढली
2

राज्यासाठी धोक्याची घंटा! एका वर्षात जन्मलिंग गुणोत्तर 912 वरून 897 वर; आरोग्य विभागाच्या अहवालाने चिंता वाढली

लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना मोठा दणका; सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई, पैशांची होणार वसुली
3

लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना मोठा दणका; सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई, पैशांची होणार वसुली

लातूर पोलिसांचा दणका:- वाहनचोरी करणाऱ्या आरोपीला अटक ६ मोटारसायकली पोलिसांच्या ताब्यात
4

लातूर पोलिसांचा दणका:- वाहनचोरी करणाऱ्या आरोपीला अटक ६ मोटारसायकली पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.