Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ; सवलतधारकांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्डची योजना

एस.टी. महामंडळाने ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 11, 2026 | 01:38 PM
Pratap Sarnaik informed that NCMC's smart card introduced in ST bus services

Pratap Sarnaik informed that NCMC's smart card introduced in ST bus services

Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या (ST News) प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवली आहे. रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन, पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एस.टी. महामंडळाने ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली. यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे.

मंत्री सरनाईक म्हणाले की, ही केवळ तांत्रिक सुधारणा नसून, प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल बळ देणारे पाऊल आहे. सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोखविरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी एका कार्डमध्ये सामावल्या जाणार आहेत. या प्रकल्पासाठी महामंडळाने मे. ईबिक्स टेक्नोलॉजिस लि. आणि NSDL पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला असून, लवकरच सर्व आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरू होणार आहे.

हे देखील वाचा : नागपूर विधानभवन विस्तार इमारतीसह, मुंबईतील मनोरा आमदार निवासाची पुनर्बांधणी; राम शिंदे यांनी घेतला आढावा

कोणाला मिळणार NCMC कार्ड?

या नव्या योजनेत समाजातील विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे:

  •  विद्यार्थी: शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ‘सरल’ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल.
  • ज्येष्ठ नागरिक व महिला: अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल.
  • दिव्यांग प्रवासी: UDID क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड.
  • पुरस्कारार्थी व पत्रकार: स्वातंत्र्यसैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालय येथील मुख्यालय आगारा मार्फत वितरण.
हे देखील वाचा : “सलमान खान हा उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा हिंदू,” नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचले…

कार्डची वैशिष्ट्ये – प्रवासात स्मार्ट सोय

  • किंमत: नवीन कार्ड १९९ रुपये (GST सह). जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास १४९ रुपयांत उपलब्ध.
  • वॉलेट मर्यादा: किमान १०० रुपये; ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज.
  • रिचार्ज सुविधा: ईटीआयएम मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंटकडून सहज रिचार्ज.
  • नोंदणीसाठी व्यापक यंत्रणा: ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी ३००० हून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले आहेत.
  • बसस्थानकांवरच नोंदणीची प्रक्रिया पार पडणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
एस.टी.चा हा निर्णय म्हणजे परंपरागत प्रवास व्यवस्थेला डिजिटल स्पर्श देणारा टप्पा आहे. तिकीट हातात आणि सुट्या पैशांची चिंता या जुन्या गोष्टी आता इतिहासजमा होत आहेत. नव्या युगात, एका स्मार्ट कार्डच्या स्पर्शाने प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.

Web Title: Pratap sarnaik informed that ncmcs smart card introduced in st bus services

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 01:38 PM

Topics:  

  • maharashtra news
  • st bus
  • st bus news

संबंधित बातम्या

MSRTC News: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! NCMC स्मार्ट कार्डशिवाय मिळणार नाही सवलत; नोंदणीला वेग
1

MSRTC News: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! NCMC स्मार्ट कार्डशिवाय मिळणार नाही सवलत; नोंदणीला वेग

Ratnagiri Bus Accident : ब्रेक निकामी, चालकाचे नियंत्रण सुटले अन्…! रत्नागिरी जिल्ह्यात दोन एसटी बसची टक्कर, 15 विद्यार्थी जखमी
2

Ratnagiri Bus Accident : ब्रेक निकामी, चालकाचे नियंत्रण सुटले अन्…! रत्नागिरी जिल्ह्यात दोन एसटी बसची टक्कर, 15 विद्यार्थी जखमी

Solapur News: देवस्थान की रंगमंच? कुंभारीच्या गेनसिद्ध महाराज मंदिरातील ‘त्या’ नृत्याचा व्हिडिओ व्हायरल; भाविकांमध्ये तीव्र संताप
3

Solapur News: देवस्थान की रंगमंच? कुंभारीच्या गेनसिद्ध महाराज मंदिरातील ‘त्या’ नृत्याचा व्हिडिओ व्हायरल; भाविकांमध्ये तीव्र संताप

St Bus News : एसटीतील जुने ट्रॉली जॅक ठरतायत ‘मृत्यूचा सापळा’; चार कर्मचाऱ्यांचा बळी, नवीन उपकरणांची मागणी
4

St Bus News : एसटीतील जुने ट्रॉली जॅक ठरतायत ‘मृत्यूचा सापळा’; चार कर्मचाऱ्यांचा बळी, नवीन उपकरणांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.