Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘डॅडी’ आता तुरुंगाबाहेर! शिवसेना नेत्याच्या हत्या प्रकरणात अरुण गवळीला जामीन मंजूर; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

१९ वर्षांनंतर अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची जेलमधून सुटका होणार. जाणून घ्या सर्वोच्च न्यायालयानेने कोणत्या आधारावर जामीन मंजूर केला आणि शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येचे प्रकरण काय होते.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 28, 2025 | 09:30 PM
‘डॅडी’ आता तुरुंगाबाहेर! शिवसेना नेत्याच्या हत्या प्रकरणात अरुण गवळीला जामीन मंजूर; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Follow Us
Close
Follow Us:
  • ‘डॅडी’ आता तुरुंगाबाहेर!
  • शिवसेना नेत्याच्या हत्या प्रकरणात अरुण गवळीला जामीन मंजूर
  • जाणून द्या कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरण काय?

Arun Gawli Bail: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला अखेर सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यामुळे तब्बल १८ वर्षांनंतर अरुण गवळी (Arun Gawali) जेलमधून बाहेर येणार आहे. मुंबईतील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती आणि तो नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

जस्टीस एम. एम. सुंदरेश आणि जस्टीस एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने गवळीला जामीन मंजूर करताना दोन प्रमुख बाबी लक्षात घेतल्या. पहिली म्हणजे, गवळीने १७ वर्षे आणि तीन महिन्यांची शिक्षा पूर्ण केली आहे आणि दुसरी, त्याचे वय ७६ वर्षे आहे. सर्वोच्च न्यायालयाने या आधारावर जामीन मंजूर केला असून, निचल्या न्यायालयाने ठरवलेल्या अटी आणि शर्तींचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची अंतिम सुनावणी फेब्रुवारी २०२६ मध्ये होणार आहे.

शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर #जामसंडेकर_हत्या प्रकरणात अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे.#ArunGawali — AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) August 28, 2025

हे देखील वाचा: अरुण गवळी कारागृहातून घेतोय ऑनलाईन शिक्षण, अंडरवर्ल्ड डॉन तीन विषयात PASS

कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरण काय?

कमलाकर जामसांडेकर यांची २ मार्च २००७ रोजी घाटकोपर येथील त्यांच्या घरी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी जामसांडेकर टीव्ही पाहत असताना हल्लेखोरांनी घरात घुसून अंदाधुंद गोळीबार केला होता, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अरुण गवळीसह ११ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली होती, तर तिघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

विशेष म्हणजे, या हत्येच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत जामसांडेकर यांनी अरुण गवळी यांच्या गटातील उमेदवार अजित राणे यांना केवळ ३६७ मतांनी हरवले होते. मुंबईतील दगडी चाळीत राहणाऱ्या अरुण गवळीवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. गवळी २००४ ते २००९ दरम्यान आमदारही होता. आता बीएमसी निवडणुका तोंडावर असतानाच त्याला जामीन मिळाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Web Title: Arun gawli granted bail in shiv sena leaders murder case supreme court decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2025 | 09:29 PM

Topics:  

  • Arun Gawli
  • bail denied
  • dagadi chawl 2
  • Mumbai
  • Suprim court

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : भाविकांसाठी उत्कृष्ट दर्जाच्या सेवा-सुविधा तयार करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : भाविकांसाठी उत्कृष्ट दर्जाच्या सेवा-सुविधा तयार करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

“रूग्णांना योग्य वेळेत उपचार मिळाले नाही तर…”, मंगलप्रभात लोढा यांचा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा
2

“रूग्णांना योग्य वेळेत उपचार मिळाले नाही तर…”, मंगलप्रभात लोढा यांचा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा

Shivaji Park Pollution: शिवाजी पार्क प्रदूषण समस्या गंभीर! पालिका, रहिवासी आणि IIT तज्ज्ञांची संयुक्त बैठक
3

Shivaji Park Pollution: शिवाजी पार्क प्रदूषण समस्या गंभीर! पालिका, रहिवासी आणि IIT तज्ज्ञांची संयुक्त बैठक

मोठी बातमी! MCA अध्यक्षपदाचा राजकीय तिढा सुटला; अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
4

मोठी बातमी! MCA अध्यक्षपदाचा राजकीय तिढा सुटला; अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.