Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Monorail News: मे महिन्यापासून मोनो ट्रॅकवर धावणार! नवीन रेकच्या संचालनासाठी हालचालींना वेग; ‘सेफ्टी ऑडिट’ची प्रतीक्षा

सप्टेंबर २०२५ पासून बंद असलेली मुंबई मोनोरेल मे २०२६ पासून पुन्हा सुरू होणार आहे. २९६ कोटींच्या नव्या कंत्राटासह मोनोरेलच्या सुरक्षेचे आणि सिग्नलिंगचे काम अंतिम टप्प्यात आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 11, 2026 | 09:16 PM
मे महिन्यापासून मोनो ट्रॅकवर धावणार! (Photo Credit- X)

मे महिन्यापासून मोनो ट्रॅकवर धावणार! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • मे महिन्यापासून मोनो ट्रॅकवर धावणार!
  • नवीन रेकच्या संचालनासाठी हालचालींना वेग
  • ‘सेफ्टी ऑडिट’ची प्रतीक्षा
Mumbai Monorail News: मोनोरेल पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार असून, दीर्घ काळानंतर आता मोनोतून प्रवास करणे शक्य होणार आहे. मोनोरेल सप्टेंबर २०२५ पासून सुरक्षिततेच्या कारणास्वत बंद असून, येथे सुरक्षा चाचणी सुरू आहे. आत ही चाचणी जवळपास पूर्णत्वास आली असून, मे महिन्यापासून मोनोरेल धावण्यासाठी सज्ज असणार आहे. चेंबूर-वडाळा-जेकब सर्कल कॉरिडॉरवर सेवा पुन्हा सुरू होण्यापूर्वी नवीन गाड्या, सिग्नलिंग आणि टेलिकॉम सिस्टीमची व्यापक चाचणी सुरू आहेत. स्वतंत्र सुरक्षा ऑडिट पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना पुन्हा सेवा दिली जाईल. संपूर्ण १९.५४ किलोमीटरचा कॉरिडॉर सप्टेंबर २०२५ पासून बंद आहे.

संचालनासाठी नवीन कंत्राटदाराची नियुक्ती

मोनोरेलच्या संचालन आणि देखभालीसाठी नवीन कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे. पॉवर मेक प्रोजेक्ट्स या कंपनीने सर्वात कमी म्हणजे २९६ कोटी रुपयांची निविदा सादर केली असून, पुढील पाच वर्षांसाठी मोनोरेल चालवण्याचे कंत्राट या कंपनीला मिळण्याची दाट शक्यता आहे, मोनोरेल सेवा पुन्हा सुरू झाल्यास पूर्व मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, दैनंदिन प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

Mumbai News: नागरिकांसाठी दिलासा! पालिका रुग्णालयांत सुरू होणार डिजिटल पेमेंट सुविधा, लांबच लांब रांगा

अभियांत्रिकी समस्येमुळे व्यत्यय

वारंवार तांत्रिक आणि अभियांत्रिकी समस्यांमुळे कामकाजात व्यत्यय आला, ज्यामुळे पुन्हा काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही प्रक्रिया मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉपोरेशन लिमिटेडद्वारे देखरेख केली जात आहे, ज्याने नवीन रोलिंग स्टॉक पुरवठादाराला उर्वरित काम जलदगतीने पूर्ण करण्यास सांगितले आहे.

प्रमाणपत्र दिले जाणार

एमएमआरडीएने गेल्या आठवड्यात आयएसए अंतर्गत सुरक्षा तपासणी सुरू केली असून ती अजून काही दिवस चालणार आहे. सर्व सुरक्षा निकष पूर्ण झाल्यानंतर मोनोरेल सुरू करण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच, मोनोरेलसाठी सीएमआरएस (कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेपटी) यांची स्वतंत्र तपासणीही होणार आहे. यासाठी निवृत्त अधिका-याची इंडिपेंडंट इंजिनिअर म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर ही प्रक्रिया सुरू केली जाईल.

Indian Railway :- रुळावर येतेय भारतीय रेल्वे : महसुलात ५.१ टक्क्यांची वाढ, आर्थिक स्थिती मजबूत

Web Title: Monorail to run on track from may movement accelerates for new rake operation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 09:16 PM

Topics:  

  • Mumbai

संबंधित बातम्या

Vasai-Virar News: ‘रस्ते सुधारा नाहीतर आंदोलन तीव्र करू’; वसई-विरारमध्ये विवेक तिवारींचा सडक सत्याग्रह
1

Vasai-Virar News: ‘रस्ते सुधारा नाहीतर आंदोलन तीव्र करू’; वसई-विरारमध्ये विवेक तिवारींचा सडक सत्याग्रह

Income Tax Office Fire: सोमवार ठरला आगीचा! चर्चगेटमधील आयकर कार्यालयाला आग, विराज प्रोफाईल कंपनीत भीषण स्फोट
2

Income Tax Office Fire: सोमवार ठरला आगीचा! चर्चगेटमधील आयकर कार्यालयाला आग, विराज प्रोफाईल कंपनीत भीषण स्फोट

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम
3

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
4

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.