माजी खासदार नवनीत राणा या असदुद्दीन ओवैसींवर आक्रमक झाल्या आहेत
अमरावती : अमरवातीच्या माजी खासदार नवनीत राणा या असदुद्दीन ओवैसींवर आक्रमक झाल्या आहेत. लोकसभेचे 18 वे अधिवेशन सुरु आहे. यामध्ये नवनिर्वाचित खासदारांनी शपथ घेतली असून अनेकांच्या शपथविधीची चर्चा रंगली आहे. यामध्ये एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शपथविधीनंतर जय पॅलेस्टाईन अशी घोषणा दिली. यामुळे लोकसभेमध्ये एकच गोंधळ झाला. देशाच्या लोकसभेच्या सभागृहामध्ये दुसऱ्या देशाचा जयघोष ऐकायला मिळाल्याने नेटकऱ्यांनी देखील नाराजी व्यक्त केली.
नवनीत राणा यांनी खासदार असदुद्दीन ओवैसी यांची तक्रार करणारे पत्र थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिले आहे. सोशल मीडियावर त्यांनी हे पत्र शेअर देखील केले आहे. नवनीत राणा यांनी औवेसींनी जय पॅलेस्टाईन अशा केलेल्या घोषणेवर राणा यांनी आक्षेप घेतला आहे. भारतीय संविधानाच्या कलम 102/103 नुसार असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रद्द करण्यात यावी, असे त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. ओवैसी यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेताना, जय पॅलेस्टाईनचा नार देत आपली शपथ पूर्ण केली होती. त्यामुळे, देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी ही घातक बाब असून त्यांनी शपथ घेताना भारतीय संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोप राणा यांनी पत्रातून केला आहे.
pic.twitter.com/vmp5l3M43V — Navnit Ravi Rana (@navneetravirana) June 27, 2024
सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांकडून देखील तक्रार
एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी खासदारकीची शपथ घेतली. यावेळी त्यांनी जय भीम, जय तेलंगणा व जय पॅलेस्टाईन अशी घोषणा दिली. त्यामुळे भाजप खासदारांनी एकच गोंधळ केला. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर औवेसींवर टीकेची झोड उठली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी ट्विट करत राष्ट्रपतींकडे तक्रार केल्याचे सांगितले आहे. ट्वीटमध्ये लिहिले आहे की, राष्ट्रपतींकडे ओवैसीसंदर्भात तक्रार केली आहे. भारतीय राज्य घटनेच्या नियम 102 आणि 103 नुसार ही तक्रार दिली आहे. त्यात त्यांचे संसद सदस्यत्व अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे.