Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रद्धेला प्रश्न विचारणे हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य; धाराशिवमध्ये ॲड. असीम सरोदे यांचे परखड विचार!

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या धाराशिव शाखेच्या वतीने शुक्रवारी ३ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ॲड. असीम सरोदे यांनी काही परखड विचार मांडले.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 04, 2026 | 07:51 PM
धाराशिवमध्ये ॲड. असीम सरोदे यांचे परखड विचार!

धाराशिवमध्ये ॲड. असीम सरोदे यांचे परखड विचार!

Follow Us
Follow Us:
  • अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून धाराशिवमध्ये व्याख्यान आयोजित
  • छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात व्याख्यान आयोजित
  • ॲड. असीम सरोदे यांनी मांडले विचार
भारताच्या संविधानामध्ये श्रद्धेचे स्वातंत्र्य जसे दिले आहे, तसेच चिकित्सा व प्रश्न विचारण्याचे कर्तव्य ही नागरिकांना दिले आहे. त्यामुळे श्रद्धेला ही प्रश्न विचारणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ॲड.असीम सरोदे यांनी धाराशिव येथे बोलताना केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या धाराशिव शाखेच्या वतीने शुक्रवारी ३ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित, कायदा व राजकारणातील भोंदूगिरी, या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले.

निगडी-चाकण मेट्रोचा सुधारित ‘डीपीआर’ तयार, भोसरीचाही समावेश; खर्च होणार तब्बल…

कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या न्यायाधीशापासून वकिलांपर्यंत असलेले लोक कसे अंधश्रद्धांचे बळी आहेत. ते सार्वजनिक स्वरूपात आपले कर्तव्य बजावत असताना ते अंधश्रद्धांच्या बाबतीत कसे वर्तन करतात. याचे सविस्तर विवेचन सरोदे यांनी केले.

तसेच राजकारणात सध्या असलेल्या भोंदूगिरीवर त्यांनी जोरदार टीका केली. सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळी ही भोंदूगिरीत सामील आहेत. याची सविस्तर माहिती त्यांनी आपल्या भाषणात दिली. धाराशिव कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, माजी मुख्याध्यापक पडवळ, माजी मुख्याध्यापक एम . डी. देशमुख, ॲड. जयंत जगदाळे, ॲड. बापू काजळे, धर्मवीर कदम, ॲड. राज कुलकर्णी, पत्रकार रवींद्र केसकर उपस्थित होते.

Nashik News : शेतकरी चिंतेत! अवकाळी पावसाचा कहर; २८ हजार हेक्टर क्षेत्र बाधित

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. अस्मिता बालगावकर आणि चंद्रकांत उळेकर यांनी चळवळीची गाणी म्हटली. प्रास्ताविक ॲड. रवींद्र मैंदाड यांनी केले. तर डॉ. अस्मिता बालगावकर या यांनी भूमिका विशद केली. सूत्रसंचालन ॲड. राम यांनी केले. तर आभार प्रदर्शन चंद्रकांत उळेकर यांनी व्यक्त केले.

Web Title: Asim sarode dharashiv lecture questioning faith citizens duty anti superstition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 07:50 PM

Topics:  

  • Dharashiv
  • maharashtra
  • Marathi News

संबंधित बातम्या

नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांवर सुरा उगारून आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
1

नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांवर सुरा उगारून आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

अहिल्यानगरमध्ये ‘विद्रोही’चे दोन दिवसीय ‘नवसमाजमाध्यम’ शिबिर उत्साहात संपन्न; नवमाध्यमांचा लोकशाहीसाठी प्रभावी वापर करण्याचे आवाहन
2

अहिल्यानगरमध्ये ‘विद्रोही’चे दोन दिवसीय ‘नवसमाजमाध्यम’ शिबिर उत्साहात संपन्न; नवमाध्यमांचा लोकशाहीसाठी प्रभावी वापर करण्याचे आवाहन

‘रस्त्याच्या मध्येच…’ यूट्यूबर मनीष कश्यप यांच्यानंतर E20 पेट्रोलवर ‘या’ व्यावसायिकाने  उपस्थित केला प्रश्न
3

‘रस्त्याच्या मध्येच…’ यूट्यूबर मनीष कश्यप यांच्यानंतर E20 पेट्रोलवर ‘या’ व्यावसायिकाने उपस्थित केला प्रश्न

Train Ticket Alert : रेल्वेच्या ‘या’ नव्या नियमामुळे लोकं नाराज; तुम्हालाही भरावा लागू शकतो दंड, ‘ही’ चूक करणं टाळा
4

Train Ticket Alert : रेल्वेच्या ‘या’ नव्या नियमामुळे लोकं नाराज; तुम्हालाही भरावा लागू शकतो दंड, ‘ही’ चूक करणं टाळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.