मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी महाराष्ट्र आणि मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावरून मनसे नेते अविनाश जाधव यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्राची प्रांतवार रचना झाली त्याचवेळी मुंबई ही मराठी माणसाची असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे भाषिक वाद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.
“भैय्याजी जोशींना भारताची प्रांतवार रचना मान्य नाही का? किंवा त्यांच्यावर विश्वास नाही का? मुंबई आणि महाराष्ट्र मराठी माणसाचाच आहे आणि कायम राहील. कोणीही काहीही म्हणो, आम्ही मराठी अस्मितेचा अपमान सहन करणार नाही,” असे जाधव यांनी ठणकावून सांगितले.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरुन राजकारण सुरुच; जयंत पाटलांनी केली सभागृहात खडाजंगी
निवडणुकीसाठी वाद उभे करण्याचा प्रयत्न?
“जेव्हा निवडणुका जवळ येतात, तेव्हा मुद्दाम प्रांतिक व भाषिक वाद निर्माण करण्याचे काम केले जाते. भैय्याजी जोशी यांनी पुन्हा एकदा असाच प्रयत्न केला आहे. मुंबईत मराठी माणूसच चालेल, अन्य कोणी नाही. जोशींनी याबाबत माफी मागितली नाही तरी निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसाच्या पाया पडतात. हे सगळं केवळ मतांसाठीच सुरू आहे,” असा आरोप जाधव यांनी केला.
RSS आणि भाजपवर गंभीर आरोप
“जर हे वक्तव्य भारतीय जनता पक्ष किंवा RSS च्या लोकांनी केले नसते, तर हा वाद उभाच राहिला नसता. त्यांना केवळ सत्तेचीच काळजी आहे. त्यांचे प्रेम ना मराठी माणसावर आहे, ना इतर भाषिकांवर. गुजरात्यांना आणि इतर भाषिकांना विरोध करून ते केवळ आपली मते सुरक्षित करू पाहत आहेत,” असा घणाघात जाधव यांनी केला. त्यांनी पुढे असेही म्हटले की, “आमच्यात एकोपा असताना हे लोक भांडण लावण्याचे काम करत आहेत. आणि नंतर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून आम्हाला मारहाण होते, असा कांगावा केला जातो.” भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या या वादामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात उकळ्या फुटण्याची शक्यता आहे.
‘चीन-भारताने एकत्र पुढे जायला हवे…’ वांग यी यांची सकारात्मक भूमिका, जयशंकर यांचा स्पष्ट इशारा
सामाजिक कार्यकर्ते आणि वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मनसे नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यांचे वक्तव्य मराठी अस्मितेचा अपमान करणारे असून, त्यांनी यापुढे राज ठाकरेंवर बोलण्याचे टाळावे, असा इशारा देण्यात आला आहे.
“गुणरत्न सदावर्ते म्हणजे फालतू माणूस”
“गुणरत्न सदावर्ते हा फालतू माणूस आहे. खरंतर, ज्यांनी त्यांच्या नावात ‘गुणवंत’ शब्द ठेवला तो मूर्खच असावा. अशा व्यक्तीने राज ठाकरेंवर बोलण्याची लायकी नाही,” असा थेट हल्लाबोल करण्यात आला आहे.”महाराष्ट्राने खूप सहनशीलता दाखवली आहे, त्यामुळेच गुणरत्न सदावर्ते सारखे लोक आपल्या फायद्यासाठी कोणत्याही विषयावर बडबड करतात. त्यांच्या विधानांचा काहीही अर्थ नसतो. त्यांनी मराठी अस्मितेवर बोलणे बंद करावे,” असा आक्रमक इशारा देण्यात आला आहे.
गुजराती समाजालाही इशारा
“गुजराती समाजानेही या वक्तव्यांचा गांभीर्याने विचार करावा. गुजरातमध्ये कोणी सांगत नाही की महाराष्ट्र हा गुजरातचा भाग आहे, मग तुम्ही सतत आम्हाला चिडवण्याचे, मराठी-गुजराती वाद लावण्याचे प्रयत्न का करता?” असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
शांतता चर्चेबाबत झेलेन्स्की यांचे मोठे वक्तव्य, सौदी अरेबियात अमेरिका-युक्रेन आमनेसामने येणार