धनंजय मुंडे राजीनामाच्या विधीमंडळामध्ये माहिती न दिल्यामुळे जयंत पाटील आक्रमक झाले आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशन हे चर्चांपेक्षा राजकीय नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांमुळे गाजते आहे. रोज नवीन मुद्द्यांवरुन नेत्यांमध्ये वादंग होताना आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. बीड हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारहाण केल्याचे फोटो समोर आल्यानंतर मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र यावरुन अद्याप राजकारण थांबलेले नाही. शरद पवार गटाचे नेते व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधीमंडळामध्ये प्रश्न उपस्थित केले आहेत.
डिसेंबर महिन्यामध्ये बीडच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामुळे बीडसह संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला. यामध्ये वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी म्हणून समोर आला आहे. तर वाल्मिक कराडसोबत संबंध असल्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली. यामुळे धनंजय मुंडे यांचे बीडचे पालकमंत्रिपद देखील नाकारण्यात आले. तर आता मुंडेंनी मंत्रिपदाचा देखील राजीनामा दिला आहे. मात्र हा राजीनामा देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन देण्यात आला. यावर आता जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती सभागृहाला का देण्यात आली नाही असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले जयंत पाटील?
शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेमध्ये यांनी मुद्दा मांडला. जयंत पाटील म्हणाले की, आपल्याला तालिकेवर बसलेले अधिकारी चुकीची माहिती देत आहेत. सभागृहातील मंत्रिमंडळातील सदस्यांचा राजीनामा झाला. हा बाहेर जाहीर करण्यात आला. याची माहिती सभागृहामध्ये देण्याची आवश्यकता आहे. अद्यापपर्यंत ही माहिती देण्यात आलेली नाही. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सभागृहामध्ये जाहीर झाल्यानंतर त्यानंतर बाहेर प्रेसला सांगण्यात येतं. स्वतः मंत्रिमहोद्यांनी सांगितलं तर समजू शकतो. पण मुख्यमंत्री बाहेर प्रेसच्या समोर जातात आणि त्यांचा राजीनामा झाला आहे हे सांगतात. आम्ही त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे आणि त्यांना पदमुक्त केलं आहे हे मुख्यमंत्री बाहेर सांगत आहेत. असं वाक्य मुख्यमंत्र्यांचं आहे. हे आधी सभागृहामध्ये सांगण्यात आलं पाहिजे. हा सभागृहाचा अपमान आहे. आणि हा अवमान झाला तरी तालिकेवरचे अधिकारी चुकीची माहिती देत आहेत. अशी प्रथा नाही. चुकीचे पायंडे पाडले जाऊ नयेत, असा आक्रमक पवित्रा जयंत पाटील यांनी घेतला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याबाबत जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर देखील पोस्ट केली आहे. जयंत पाटील यांनी एक्सवर व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती सरकारकडून सभागृहाला देण्यात आली नाही. प्रसार माध्यमांच्या माध्यमातून त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री जाहीर करतात, ही सभागृहाची प्रथा परंपरा नाही. याबद्दल आम्ही सभागृहात खेद व्यक्त केला. तसेच, हा सभागृहाचा अवमान असल्याने महाविकास आघाडीच्या सर्व विधानसभा सदस्यांनी सभात्याग केला, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती सरकारकडून सभागृहाला देण्यात आली नाही. प्रसार माध्यमांच्या माध्यमातून त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री जाहीर करतात, ही सभागृहाची प्रथा परंपरा नाही. याबद्दल आम्ही सभागृहात खेद व्यक्त केला. तसेच, हा सभागृहाचा अवमान असल्याने महाविकास… pic.twitter.com/5Lb6i8B4G9
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) March 7, 2025