नागपूर: ज्या औरंगजेबावरून राज्यभरात वातावरण तापलं आहे. औरंगजेबाची कबर उखडून टाकण्यासाठी हिंदुत्त्ववाद्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. हा वाद काहीसा शमला असताना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी पुन्हा मोठे विधान केले आहे. “औरंगजेबाच्या थडग्याचा मुद्दा अनावश्यक आहे. औरंगजेबाचा मृत्यू येथे झाला आणि त्याची कबर बांधण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानची कबर बांधून एक आदर्श ठेवला होता. हे भारताच्या उदारता आणि समावेशकतेचे प्रतिबिंब आहे. कबर तशीच राहील आणि ज्याला ती पहायची असेल तो जाऊ शकतो.
पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावर भैयाजी जोशी यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींचा ३० मार्चचा कार्यक्रम चांगला होता. कोरोना काळात त्यांची सेवेतील आवड दिसून आली. कोरोना काळात त्यांनी ऊर्जा देण्याचे काम केले. माधव नेत्र रुग्णालयाचा भूमिपूजन समारंभ त्यांच्या हस्ते पार पडला. हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल.
शेंगदाणे खोबऱ्याची चटणी खाऊन कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा आंबट गोड अननसाची चटकदार चटणी
भैय्याजी जोशी यांनी संघाच्या उत्तराधिकाऱ्याबद्दलही भाष्य केलं आहे. “पंतप्रधान मोदींच्या उत्तराधिकारीबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, हे परंपरेनुसार होईल. सध्या आपल्याकडे याबद्दल कोणतीही माहिती नाही. भैयाजी जोशी यांच्याव्यतिरिक्त, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पंतप्रधान मोदींच्या उत्तराधिकारीच्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान मोदी पुढील अनेक वर्षे देशाचे नेतृत्व करत राहतील, असे मुख्यमंत्र्यांनी सोमवारी सांगितले. खरं तर, शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी दावा केला होता की पंतप्रधान मोदी रविवारी नागपूरला जाऊन संघ प्रमुख मोहन भागवत यांना निवृत्त होत असल्याचा संदेश दिला होता. त्यांच्या विधानावर फडणवीस म्हणाले की, पुढील निवडणुकीत (२०२९)ही आपण मोदींना पंतप्रधान म्हणून पाहू.
‘मी पाठीशी आहे’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची अखेर वाट मोकळी, केव्हा होणार सिनेमा रिलीज
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याची गरज नाही. नरेंद्र मोदी आमचे नेते आहेत आणि ते पदावर राहतील. नेता सक्रिय असताना उत्तराधिकाराची चर्चा करणे देशाच्या संस्कृतीत योग्य नाही. संजय राऊत यांनी दावा केला होता की नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातून असेल. यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आपल्या संस्कृतीत वडील जिवंत असताना वारसाहक्काबद्दल बोलणे अयोग्य मानले जाते. संजय राऊत ज्याबद्दल बोलत आहेत ती मुघल संस्कृती आहे.