सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा आंबट गोड अननसाची चटकदार चटणी
जेवणात तोंडी लावण्यासाठी घरी वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवल्या जातात. शेंगदाणे चटणी, खोबऱ्याची चटणी, कैरीची चटणी किंवा इतर अनेक वेगवेगळ्या चटण्या जेवणात तोंडी लावण्यासाठी बनवल्या जातात. चटणी तुम्ही चपाती, भात किंवा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. चटणीचे नाव घेतल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये अननसाची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली चटणी चवीला अतिशय सुंदर लागते. तसेच अननसामध्ये असलेले गुणकारी घटक आरोग्यसाठी अतिशय फायदेशीर ठरतात. अननसमध्ये विटामिन सी आणि इतर आवश्यक घटक आढळून येतात. त्यामुळे तुम्ही कोणत्याही वेळी अननसाची चटणी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया अननस चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
वर्षभर टिकणारा चाट मसाला आता सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा, फळांना लागेल चटकदार चव