Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणवासीयांच्या सुखकर प्रवासासाठी कणकवलीत प्रवासी संघातर्फे जनजागृती अभियान

कोकणवासीयांच्या सुखकर प्रवासासाठी कणकवलीत प्रवासी संघातर्फे जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कणकवलीत प्रवासी संघातर्फे गणेश भक्त, प्रवाशांचे, वाहन चालकांचे स्वागत करण्यात आले. तसेच कोकणवासीयांच्या सुखकर प्रवासाचा संदेश देण्यात आला. गणेशोत्सव सर्वांनी आनंद, उत्साहात व शांततेत साजरा करुया, अंस आवाहन णकवली नगरपंचायत मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी केलं.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 04, 2024 | 01:48 PM
कोकणवासीयांच्या सुखकर प्रवासासाठी कणकवलीत प्रवासी संघातर्फे जनजागृती अभियान

कोकणवासीयांच्या सुखकर प्रवासासाठी कणकवलीत प्रवासी संघातर्फे जनजागृती अभियान

Follow Us
Close
Follow Us:

कणकवलीत प्रवासी संघातर्फे गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणवासीयांच्या सुखकर प्रवासासाठी जनजागृती अभियान राबवून चाकरमान्यांचे व वाहनचालकांचे स्वागत केले जाते. हा कौतुकास्पद उपक्रम आहे. वाहनचालकांमध्ये या निमित्ताने सुखकर प्रवासासाठी प्रवासी संघातर्फे जनजागृती केली जाते. यंदा देखील हे अभियान राबवण्यात आलं. या कार्यक्रमाला कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी गौरी पाटील उपस्थित होत्या. उत्सव काळात वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहने चालवावीत. समाजातील सर्व घटकांनी व चाकरमान्यांनी एकत्रित येवून गणेशोत्सव सर्वांनी आनंद, उत्साहात व शांततेत साजरा करुया असे आवाहन गौरी पाटील यांनी केले.

हेदेखील वाचा- पुन्हा हिट अँड रनचा थरार, भरधाव कारने महिलेला इतकं फरफटतं नेलं की…, मालाडमध्ये नेमकं काय घडलं?

कणकवली पटवर्धन चौक येथे प्रवासी संघातर्फे दरवर्षीप्रमाणे कोकणात येणाऱ्या चाकरमानी, वाहन चालकांचे स्वागत व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई येथुन खाजगी बसने आलेल्या चाकरमानी व वाहनचालकांचे गुलाबपुच्छ व चहा देऊन स्वागत करण्यात आलं. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जनजागृतीपर माहितीपत्रकाचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनार्दन शेळके यांनी केले, तर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचे व प्रवाशांचे आभार प्रवाशी संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे यांनी मानले.

या कार्यक्रमाला कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप, परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक संदीप भोसले, कणकवली मंडल अधिकारी मेघनाथ पाटील, प्रवासी संघ अध्यक्ष मनोहर पालयेकर, जिल्हा बॅंक संचालक सुशांत नाईक, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, प्रवासी संघ सल्लागार सिताराम उर्फ दादा कुडतरकर, जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, मानवी हक्क जिल्हाध्यक्ष राजन भोसले, सखाराम सपकाळ, राजन रेगे, वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण, पत्रकार भगवान लोके, प्रवासी संघ सचिव विलास चव्हाण, उपाध्यक्ष रमेश जोगळे, सदस्य सुभाष राणे, संदेश मयेकर, मोहन सावंत, रविंद्र कडुलकर, उदय सावंत, जनार्दन शेळके, अर्जुन राणे, केशव जाधव, महानंद चव्हाण, सुगंधा देवरुखकर, श्रद्धा कदम, मयुर ठाकुर, पूजा सावंत, हेमंत शिरसाठ, अमित मयेकर यांच्यासह प्रवासी संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेदेखील वाचा- दिवाळी आणि छठ पूजा उत्सवादरम्यान 28 फेस्टिवल स्पेशल ट्रेन धावणार! मध्य रेल्वे प्रशासनाची माहिती

यावेळी पोलीस निरिक्षक मारुती जगताप म्हणाले की, गणेशोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांचे आगमन होत आहे. कणकवली पोलीस विभागामार्फत आम्ही गणेश भक्तांचे, चाकरमान्यांचे स्वागत करतो. हा सण शांततेत साजरा करण्यासाठी आमच्याकडून चोख नियोजन केलेले आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी प्रशासनाने ठरवून दिलेल्या ठिकाणी वाहनचालक व व्यावसायिकांनी जागेचा वापर करावा. प्रवासी संघाने हा कार्यक्रम आयोजित करत चांगली जनजागृती केली आहे.

जिल्हा बॅंकेचे संचालक सुशांत नाईक म्हणाले की, कणकवली प्रवाशी संघातर्फे हा कार्यक्रम दरवर्षी राबवला जातो. चाकरमान्यांचे स्वागत केलं जाते. हा उपक्रम कौतुकास्पद आहे. विविध समस्या घेवून हा प्रवासी संघ सातत्याने विविध विभागांना पत्रव्यवहार करत आहे.

प्रवासी संघाचे अध्यक्ष मनोहर पालयेकर म्हणाले की, प्रवासी संघ हा चाकरमान्यांच्या स्वागताचा कार्यक्रम गेली ७ वर्षे करत आहे. या स्वागता दरम्यान व्यसन मुक्त प्रवास, वेगावर नियंत्रण ठेवून वाहनचालकांनी वाहने चालवावीत, याबाबत जनजागृती केली जाते. तसेच प्रवासी संघाकडून कणकवली रेल्ले स्थानक फलाटावर शेड ची मागणी केलेली आहे. तसेच एसटी आगारामध्ये प्रवाशांना स्वच्छ पाणी, तसेच स्वच्छतागृहामध्ये नेहमी साफसफाई व्हावी, ग्रामीण भागात एसटी बस सेवा सातत्यपूर्वक राहावी या मागण्या सातत्यपूर्वक आहेत. प्रवाशांना सुखाचे दिवस येण्यासाठी आमचे प्रयत्न सातत्याने राहतील.

Web Title: Awareness campaign by pravasi sangh in kankavli for the smooth journey of konkan people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 01:48 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.