उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेरगावी जाणाऱ्यांसाठी रेल्वेकडून खुशखबर; पश्चिम रेल्वेकडून 930 समर स्पेशल ट्रेन (File Photo : train)
देशभरात विविध सण साजरे केले जात आहेत. काही दिवसांतच गणपतीचं आगमन होईल. त्यानंतर सर्वत्र दिवाळी आणि छठ पूजा उत्सव साजरा केला जाईल. दिवाळी आणि छठ पूजा उत्सवादरम्यान भारताच्या उत्तर भागात प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड असते. त्यामुळे अशा वेळी गाड्यांना प्रचंड गर्दी होते आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. प्रवाशांच्या या समस्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने 28 फेस्टिवल स्पेशल गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे सणं साजरा करण्यासाठी उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही.
हेदेखील वाचा- सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला दाऊद इब्राहिम टोळीकडून धोका; कुटूंबियांनी केली ‘ही’ मागणी
01053 साप्ताहिक विशेष बुधवार 30/10/2024 आणि 06/11/2024 रोजी एलटीटी मुंबई येथून 12.15 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी 16.05 वाजता बनारसला पोहोचेल. 01054 साप्ताहिक विशेष गुरूवार 31/10/2024 आणि 07/11/2024 रोजी बनारसपासून 20.30 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी 23.55 वाजता एलटीटी मुंबईला पोहोचेल. ह्या दोन्ही ट्रेन कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज, छिवकी आणि वाराणसी या स्थानकांवर थांबतील.
01009 ही द्वि-साप्ताहिक ट्रेन विशेष 26/10/2024, 28/10/2024, 02/11/2024 आणि 04/11/2024 रोजी एलटीटी मुंबईवरून 12.15 वाजता सुटेल आणि पुढील दिवशी 17:00 वाजता दानापूर येथे पोहोचेल. 01010 द्वि-साप्ताहिक विशेष दानापूरहून 27/10/2024, 29/10/2024, 03/11/2024 आणि 05/11/2024 या दिवशी 18:15 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी 23:55 वाजता एलटीटी मुंबईला पोहोचेल. ही ट्रेन कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खांडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेवकी, पं दीनदयाल, उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा या स्थानकांवर थांबेल.
हेदेखील वाचा- धक्कादायक! हॉटस्पॉट देण्यास नकार, रागात केली मॅनेजरची हत्या; एकाला अटक
01043 ही एलटीटी-समस्तीपूर साप्ताहिक स्पेशल ट्रेन एलटीटी मुंबईहून गुरुवारी 31/10/2024 आणि 07/11/2024 रोजी दुपारी 12.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 21.15 वाजता समस्तीपूरला पोहोचेल. तर 01044 साप्ताहिक स्पेशल शुक्रवारी 01/11/2024 आणि 08/11/2024 पर्यंत समस्तीपूर येथून 23.20 वाजता निघेल आणि एलटीटी मुंबईला दुसऱ्या दिवशी 07.40 वाजता पोहोचेल. ह्या दोन्ही ट्रेन कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेवकी, पंदीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आराह, दानापूर, पाटलीपुत्रा, आणि मुझफ्फरपूर या स्थानकांवर थांबतील.
01045 साप्ताहिक विशेष ट्रेन मंगळवार 29/10/2024 आणि 05/11/2024 रोजी एलटीटी मुंबईहून 12.15 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी 11.20 वाजता प्रयागराजला पोहोचेल. 01046 AC साप्ताहिक स्पेशल ट्रेन बुधवारी 30/10/2024 आणि 06/11/2024 रोजी प्रयागराजहून 18.50 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी 16.05 वाजता एलटीटी मुंबईला पोहोचेल. फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन क्रमांक 01053, 01009, 01043, 01045 आणि 01123 च्या प्रवासासाठी विशेष शुल्कावरील बुकिंग 5 सप्टेंबर 2024 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरु होणार आहे.