
मुंबई – आंतरराष्ट्रीय पुरुष दिन (International Mens Day) साजरा केला जात असताना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्वीट केले आहे. त्यामुळे पुन्हा चर्चा रंगली आहे. काबाडकष्ट करत मुलांना घडवतो तो… स्वत: उपाशी राहत इतरांना भरवतो तो… हलाखीत दिवस काढत मुलांनी शिकावं यासाठी झटतो तो.. हलाखीचे दिवस काढत इतरांचे स्वप्न पूर्ण करतो तो… आणि गर्दीतून महिलांना सन्मानाने वाट काढून दिली तरीही गुन्हा दाखल होतो तो पुरुष…, असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपच्या (BJP) महिला पदाधिकारी रिदा रशीद यांच्या तक्रारीनंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा (Molestation Case) दाखल झाला आहे. या प्रकारावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणाही केली होती.
काबाडकष्ट करत मुलाबाळांना घडवतो तो..
स्वतः उपाशी राहत इतरांना भरवतो तो..
हलाखीत दिवस काढत मुलांनी शिकावं यासाठी झटतो तो..
हलाखीचे दिवस काढत इतरांचे स्वप्न पूर्ण करतो तो..
आणि
गर्दीतून महिलांना सन्मानाने वाट काढून दिली तरीही गुन्हा दाखल होतो तो पुरुष#आंतरराष्ट्रीय_पुरुष_दिवस pic.twitter.com/hHg6Jv2yJO — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 19, 2022
मी एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) भेटायला जात असताना समोरून आमदार जितेंद्र आव्हाड आले. स्थानिक आमदार असल्याने मी त्यांना पाहून स्मितहास्य केले. तेव्हा त्यांनी ‘तू इथे काय करतेस’ म्हणत हाताने जोरात धरून बाजूला लोटले, असा आरोप रशीद यांनी केला. या आरोपानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा खोटा असल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. त्यानंतर कोर्टात धाव घेणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला. हा गुन्हा त्यांच्या जिव्हारी लागला आहे.