
नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, फडणवीसांवर घणाघाती हल्ला (photo Credit- X)
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच भाजपच्या ‘दत्तक’ विधानावरून केली. “देवेंद्र फडणवीस नाशिक दत्तक घेतल असे म्हणाले होते. ज्यांना राजकारणात पोरं होत नाहीत, ते आज आमची पोरं पळवत आहेत,” अशी बोचरी टीका त्यांनी केली. भाजप आता निष्ठावंतांचा राहिला नसून तो ‘उपटसुंभांचा’ आणि ‘उपऱ्यांचा’ पक्ष झाला आहे, असा आरोपही त्यांनी केला.
भाजपच्या हिंदुत्वावर शंका उपस्थित करत ठाकरे म्हणाले की, तुमचं हिंदुत्व खरं आहे की चुनावी? राम मंदिराचा डंका पिटता, पण रामाच्या तपोभूमीतील झाडे कापली जात आहेत. उद्या प्रभू राम कुठे राहिले? असं विचारल्यावर ते शासकीय विश्रामगृहात राहिले असं सांगणार का? सलिम कुत्ताच्या साथीदारासोबत फोटो असलेल्या नेत्यांना पक्षात घेण्यावरून त्यांनी भाजपच्या ‘कुत्ता-बिल्ली’ राजकारणावर जोरदार प्रहार केला.
Maharashtra Politics: “कुणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात…”; राज ठाकरे काय बोलून गेले?
भाजपमधील मूळ कार्यकर्त्यांबद्दल सहानुभूती व्यक्त करताना ठाकरे म्हणाले, देवयानी फरांदे यांच्यासारख्या निष्ठावंतांना आज रडू येत आहे, कारण पक्ष आज उपऱ्यांच्या हातात गेला आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणतात भाजपला दरवाजे नाहीत, पण या उघड्या दरवाज्यातून उद्या हे रावणालाही पक्षात घेतील, इतके हे निर्लज्ज झाले आहेत.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणूक आयोग शेपूट घालून बसले आहे. आज आपण सावध झालो नाही, तर भविष्यात गुलामीत राहावे लागेल. आम्हाला सत्ता केवळ खुर्चीसाठी नको, तर तुमच्या विकासासाठी पाहिजे, असे आवाहन त्यांनी नाशिककरांना केले.