Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंढरपूर तालुक्यात येणाऱ्या सर्व मार्गांवर स्वागत मंडपासह कमान घालण्यास बंदी; प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

माळशिरस तालुक्यातून पालखी सोहळे, पिराची कुरोली येथे बंधू भेट होऊन पुढे पंढरपूरकडे निघतात. त्यावेळी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी मंडप घातले जातात. स्वागत कमानी उभारल्या जातात.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 20, 2025 | 03:24 PM
पंढरपूर तालुक्यात येणाऱ्या सर्व मार्गावर व शहरात स्वागत मंडप, कमान घालण्यास प्रतिबंध

पंढरपूर तालुक्यात येणाऱ्या सर्व मार्गावर व शहरात स्वागत मंडप, कमान घालण्यास प्रतिबंध

Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर : आषाढी यात्रा सोहळा 6 जुलैला संपन्न होत आहे. आषाढी यात्रा सोहळ्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तसेच अन्य पालखी सोहळ्यासोबत लाखो भाविक पंढरपूर येथे येतात. या भाविकांची यात्रा सुलभ व सुरक्षितपणे पार पडावी, यासाठी पंढरपूर तालुक्यात प्रवेश करणाऱ्या सर्व मार्गावर, शहराच्या हद्दीवर आणि शहरात स्वागत कमान, स्वागत मंडप घालण्यास 15 जुलैपर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी पारीत केले आहेत.

माळशिरस तालुक्यातून पालखी सोहळे, पिराची कुरोली येथे बंधू भेट होऊन पुढे पंढरपूरकडे निघतात. त्यावेळी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी मंडप घातले जातात. स्वागत कमानी उभारल्या जातात. तसेच पालखी मार्गावर ठिकठिकाणी स्वागत फलक, फ्लेक्स व बॅनर लावले जातात. पालखी सोहळ्यासोबत लाखो भाविक पायी चालत पंढरपूरकडे येतात. विसाव्यासाठी तसेच न्याहारी व भोजनासाठी ते ठिकठिकाणी थांबतात. पालखी सोहळ्यासाठी स्वागत मंडप व स्वागत स्टेजमुळे सोहळ्यासोबत असणाऱ्या भाविकांना पुढे जाण्यास अडथळे निर्माण होतात.

दरम्यान, ठिकठिकाणी स्वागतासाठी थांबलेल्या भाविकांमुळे पालखी सोहळ्यासोबत असणाऱ्या वारकऱ्यांना पुढे जाण्यास तसेच पालखी सोहळा वेळेत पुढील विसाव्यावर पोहचण्यास विलंब होतो. तसेच गर्दीचे व्यवस्थापन होत नाही. त्यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे.

तसेच मार्गावर व रस्ता दुभाजकावर लावलेले फ्लेक्स व बॅनरमुळे भाविकांना रस्त्यावरील वाहने दिसत नाहीत. त्यामुळे अपघात होण्याचा धोका निर्माण होतो. तसेच होर्डिंग्ज व बॅनरची उंची जास्त असते. वादळी वाऱ्यामुळे किंवा वाहनांचा धक्का लागून ते कोसळू शकतात व त्यातून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी उपविभागीय दंडाधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (२) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

Web Title: Ban on erecting welcome pavilions and arches on all roads entering pandharpur taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2025 | 02:38 PM

Topics:  

  • Ashadhi Ekadashi
  • Ashadhi Ekadashi 2025
  • pandharpur wari

संबंधित बातम्या

आषाढी यात्रेदरम्यान श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराला मिळाले 10 कोटी 84 लाखांचे उत्पन्न; विविध देणग्यांचा आहे समावेश
1

आषाढी यात्रेदरम्यान श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराला मिळाले 10 कोटी 84 लाखांचे उत्पन्न; विविध देणग्यांचा आहे समावेश

नातेपुते येथे माऊलींच्या पालखीचे परतीच्या प्रवासात उत्साहात स्वागत; परिसर बनला भक्तिमय
2

नातेपुते येथे माऊलींच्या पालखीचे परतीच्या प्रवासात उत्साहात स्वागत; परिसर बनला भक्तिमय

Solapur News : सफाई कामगारांसोबत जिल्हाधिकाऱ्यांचा अल्पोपहार; कर्मचाऱ्यांच्या थेट घरी जाऊन घेतला चहापान
3

Solapur News : सफाई कामगारांसोबत जिल्हाधिकाऱ्यांचा अल्पोपहार; कर्मचाऱ्यांच्या थेट घरी जाऊन घेतला चहापान

Chaturmas 2025 : चतुर्मास म्हणजे काय ? या महिन्यात व्रत का करतात ?
4

Chaturmas 2025 : चतुर्मास म्हणजे काय ? या महिन्यात व्रत का करतात ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.