Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati By Election: बारामतीसाठी निवडणूक आयोगाचा मास्टर प्लॅन! अंतिम मतदार यादी जाहीर; एकूण ३.८३ लाख मतदार

भारत निवडणूक आयोगाने ६ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या पत्रानुसार बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 12, 2026 | 10:42 AM
Baramati By Election.

Baramati By Election.

Follow Us
Close
Follow Us:
  • बारामती मतदारसंघाची नवी मतदार यादी
  • बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष सघन पुनरीक्षण
  • प्रारूप मतदार यादीत एकूण मतदारसंख्या ३ लाख ८८ हजार ३७१ इतकी नोंद
Baramati By Election:  बारामती (२०१) विधानसभा मतदारसंघाच्या आगामी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. बारामती (२०१) विधानसभा मतदारसंघाच्या आगामी पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण करून अंतिम मतदार यादी आज १० मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अंतिम यादीनुसार मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या ३ लाख ८३ हजार ७६७ इतकी झाली आहे.

BREAKING: मुंबई विधान भवनाला इमेलद्वारे धमकी; पोलीस यंत्रणा अलर्टवर

भारत निवडणूक आयोगाने ६ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या पत्रानुसार बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर ९ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात आल्या. प्राप्त अर्जाची छाननी करून आवश्यक ती दुरुस्ती केल्यानंतर अंतिम मतदार यादी १० मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अंतिम मतदार यादीत पुरुष मतदारांची संख्या १ लाख ९३ हजार ४९६, महिला मतदारांची संख्या १ लाख ९० हजार २७१, तर इतर मतदारांची संख्या २४ असून एकूण मतदारसंख्या ३ लाख ८३ हजार ७६७इतकी आहे. यापूर्वी २० ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत एकूण मतदारसंख्या ३ लाख ६० हजार ६०८ इतकी होती. त्यानंतर ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत एकूण मतदारसंख्या ३ लाख ८८ हजार ३७१ इतकी नोंदविण्यात आली होती.

Pune Crime: पुण्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना! नर्सिंग विद्यार्थिनीची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप

अपील करण्याची तरतूद

अंतिम मतदार यादी सर्व नागरिक व राजकीय पक्षांसाठी पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आली असून यासंदर्भात लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मधील तरतुदीनुसार अपील करण्याची तरतूद आहे. संबंधित अपील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांच्याकडे १५ दिवसांच्या आत दाखल करता येईल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी दिली.

 

Web Title: Baramati by election final voters list released total voters reach 383 lakh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 10:19 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.