BREAKING: मुंबई विधान भवनाला इमेलद्वारे धमकी; पोलीस यंत्रणा अलर्टवर
Vidhan Bhavan Threat New: मुंबईच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबईतील विधान भवनाच्या अधिकृत संकेतस्थळावर (Website) एका अज्ञात व्यक्तीने धमकीचा इमेल पाठवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी विधान भवन परिसरात तातडीने शोधमोहीम हाती घेतली आहे.
राज्यात सध्या सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सदस्य आणि अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्ती (VIPs) विधान भवन परिसरात उपस्थित आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. जोपर्यंत पोलिसांची शोधमोहीम पूर्ण होत नाही, तोपर्यंत विधान भवन परिसरात प्रवेश तात्पुरता बंद करण्यात आला आहे. कोणालाही आत जाण्यास परवानगी दिली जात नाहीये.
हा धमकीचा इमेल कोणी आणि कुठून पाठवला, याचा शोध सायबर सेल आणि पोलीस प्रशासनाकडून युद्धपातळीवर घेतला जात आहे. धमकीचे गांभीर्य लक्षात घेता संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले असून, बॉम्ब शोधक व नाशक पथकही
सध्या विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने विधान भवन परिसरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील महत्त्वाचे मंत्री आणि अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्ती (VIPs) उपस्थित आहेत. या संवेदनशील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकाबंदी केली असून सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.
‘महाराष्ट्र जगात 30 वी अर्थव्यवस्था; ऑस्ट्रिया, थायलंड, बांगलादेशला टाकले मागे
बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (BDDS) तसेच श्वान पथकाच्या साहाय्याने परिसराच्या कानाकोपऱ्याची तपासणी केली जात आहे. धमकीचा इमेल नेमका कुठून आणि कोणाच्या आयपी ॲड्रेसवरून (IP Address) पाठवण्यात आला आहे, याचा तपास सायबर सेलच्या माध्यमातून युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस प्रशासनाने नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.(BDDS) पाचारण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
बातमी अपडेट होत आहे….






