bjp mla Suresh dhas son sagar dhas accident news in marathi
Suresh Dhas son Accident : बीड : बीडचे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे. कारण सुरेश धस यांच्या मुलाचा भीषण अपघात झाला आहे. अहिल्यानगर-पुणे महामार्गावर ही भीषण घटना घडली असून त्यांच्या मुलाच्या चार चाकी गाडीने दुचाकीला घडक दिली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्यामुळे आमदार सुरेश धस आणि त्यांच्या मुलाच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, या अपघातामध्ये मृत पावलेल्या दुचाकी स्वाराचे नाव नितीन शेळके असे असून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुणे अहिल्यानगर महामार्गावर रात्री साडेदहा-अकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात दुकाकीस्वार ठार झाला आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर सुरेश धस याच्या चारचाकी वाहनाने थेट दुचाकीस्वाराला धडक दिली आहे. दुचाकीस्वार जातेगाव फाट्याकडून येत असताना सागर धस याने मागून जोराची धडक दिली आहे. त्यानंतर नितीन शेळके या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या अपघात प्रकरणातील मृत तरुण नितीश शेळके याचा चुलत भाऊ स्वप्नील शेळके याने या अपघातानंतर पोलिसांत फिर्याद नोंदवली आहे. या फिर्यादीनुसार मृत तरुण नितीन शेळके हा हिरो कंपनीच्या मोटारसायकलने जातेगाव फाटा येथे नगर-पुणे रोड ओलांडत होता. यावेळी एमजी कंपनीची कार भरधाव वेगाने आली. या कारने नितीन शेळके याच्या दुचाकीला डाव्या बाजूने जोराची धडक दिली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्यानंतर जखमी असलेल्या नितीशला तात्काळ जवळ असणाऱ्या निरामय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पडून शवविच्छेदनानंतर मृतदेह नितीश शेळके याच्या कुटुंबीयाकडे सोपवण्यात आला. दरम्यान, या अपघातानंतर सुपा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मीरा भाईंदरमध्ये मनसे आक्रमक
मीरा-भाईंदरमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून मराठीच्या मुद्द्यावरून मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला. मोर्चाचं नेतृत्व करणारे मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी मोर्चापूर्वीच ताब्यात घेतलं होतं. त्यानंतरही मराठी माणसांनी मोठ्यासंख्येने रस्त्यावर उतरत मोठं आंदोलन केले.अविनाश जाधव पुढे म्हणाले की, आपली एकजुट कायम राहू द्या. मराठी माणसाच्या नादाला लागू नका. आपली एकजुट कायम ठेवूया. जिथे कुठे दबाव टाकण्यात येईल तिथे मराठी माणूस एक होईल. मराठी माणसाच्या कोणी नादाला लागेल तर लक्षात ठेवा, असा कडक शब्दात इशारा त्यांनी दिला आहे.