'...तर मराठी माणूस पुरून उरेल', मनसेचे नेते अविनाश जाधव यांचा कडक इशारा
‘धरपकड झाली नसती आणि हा मोर्चा सुरळीत पार पडला असता तर हा किमान ५० हजार लोक मोर्चात आले असते. मराठी माणसांसाठी अशीच एकजुट आपण दाखवूया. मीरा-भाईंदरमध्ये मराठी माणूस फक्त १२ ते १५ टक्के आहे,असं इथला आमदार नरेंद्र मेहता नेहमी सांगतो. पण तेवढ्या टक्क्यावर आम्ही तुला पूरून उरू शकतो, असा इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे.
मीरा-भाईंदरमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून मराठीच्या मुद्द्यावरून मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला. मोर्चाचं नेतृत्व करणारे मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी मोर्चापूर्वीच ताब्यात घेतलं होतं. त्यानंतरही मराठी माणसांनी मोठ्यासंख्येने रस्त्यावर उतरत मोठं आंदोलन केले.
MNS Morcha News: प्रताप सरनाईक मोर्चातून बाहेर; आंदोलकांचा कडाडून विरोध
अविनाश जाधव पुढे म्हणाले की, आपली एकजुट कायम राहू द्या. मराठी माणसाच्या नादाला लागू नका. आपली एकजुट कायम ठेवूया. जिथे कुठे दबाव टाकण्यात येईल तिथे मराठी माणूस एक होईल. मराठी माणसाच्या कोणी नादाला लागेल तर लक्षात ठेवा, असा कडक शब्दात इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान पोलिसांनी सुटका केल्यानंतर अविनाश जाधव यांनी थेट मीरारोड गाठले आणि मोर्चात सहभागी झाले. यावेळी त्यांनी सरकारवरही टीका केली. ‘महाराष्ट्रात कुठेही मराठी माणसासोबत काही घडलं तर असेच मोर्चे निघतील याची सरकारने दखल घ्यावी.’, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
आपली एकजुट कायम राहू द्या. मराठी माणसाच्या नादाला लागू नका. आपली एकजुट कायम ठेवूया. जिथे कुठे दबाव टाकण्यात येईल तिथे मराठी माणूस एक होईल. मराठी माणसाच्या नादाला कुणी लागेल त्याने लक्षात ठेवावे.’ अशा शब्दात अविनाश जाधव यांनी इशारा दिला.
तसंच, ‘मला रात्री पकडलं त्यावेळी मी जेवढा अवस्वस्थ झालो नव्हतो तेवढा मी इथे येताना अस्वस्थ होतो. जे काही मराठी माणसाने आज मीरारोड- भाईंदरमध्ये करून दाखवलं त्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मी ज्या पोलिस स्टेशनला होतो त्या पोलिस स्टेशनचा प्रत्येक हवालदार टीव्हीवर हाच मोर्चा पाहात होता. आंदोलन झाल्यानंतरचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी पाहत होतो. तो आनंद एका सर्वसामान्य मराठी माणसाच्या चेहऱ्यावरील होता. हा आनंद महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाने घेतला असेल. प्रत्येक घराघरात हे आंदोलन गेलं आहे.
‘वसई-विरार परिसरातील आमच्या मनसौनिकांना अटक करण्यात आली. त्यानंतर लोकं रस्त्यावर उतरली. आमच्या लोकांना गाडीतून घेऊन जात होते. उचलू उचलू गाडीत भरत होते. आम्ही काय दहशतवादी आहोत का? मीरा-भाईंदर हे महाराष्ट्रात आहे की राजस्थान आणि गुजरातमध्ये आहे. मीरा-भाईंदर हे महाराष्ट्रात असल्यास मराठी माणसाला त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे.’ तसंच, ‘नरेंद्र मेहता या माणसामुळे हा मोर्चा निघाला. ३० ते ४० सेकंदाचा व्हिडीओ त्याने व्हायरल केला. या सगळ्याची जबाबदारी त्या माणसाची आहे. इथला मराठी माणूस त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. मराठी माणसाला कमजोर समजू नका. या महाराष्ट्राचा इतिहास मोठा आहे. आम्ही उपाशी मरणार नाही. आम्ही ठरवले तर तुम्ही उपाशी मराल.’, असंही अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.