Bala Bangar on Walmik Karad: “माझा परळीच्या पोलिसांवर विश्वास फार कमी आहे. वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या वाईटावरच टपला होता. धनंजय मुंडे यांना संपवून त्याला पोटनिवडणूक घ्यायची होती,” असा धक्कादायक खुलासा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडचा जुना सहकारी बाळा बांगर यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर, धनंजय मुंडे यांचे पीए प्रशांत जोशी यांनाही संपवण्याचा कटही कराडने रचला होता. त्याने माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनाही त्रास दिला. त्यामुळे ठोस आश्वासन मिळेपर्यंत मागे हटणार नाही, असंही बाळा बांगर यांनी म्हटलं आहे.
वाल्मिक कराड प्रकरणात बाळा बांगर यांनीकाही धक्कादायक दावे केले आहेत. या प्रकरणात बोलू नये यासाठी माझ्यावर दबाव आणला जात होता. पण मी या प्रकरणात जबाब दिल्याचे त्यांना माहिती नव्हते. मी घाबरणार नाही आणि माघारही घेणार नाही. वाल्मिक कराडनेच परळीला कीड लावली. मीच फरार असल्याने या प्रकरणात बोलायला मला उशीर लागला. प्रशासनाने वाल्मिक कराडला आणि त्याच्या टोळीला अभय दिले होते. पण आता वाल्मिक कराड कधी बाहेर येणार नाही, असंही बाळा बांगर यांनी म्हटलं आहे.
World IVF Day: तिशीत केले जाणारे आयव्हीएफ आणि 40 वयातील आयव्हीएफमधील फरक
तसेच, काल व्हायरल झालेली रेकॉर्डिंग आपण व्हायरल केली नाही, असे माझ्या पत्नीने सांगितले. पण त्या रेकॉर्डिंगचे सीडीआर काढावेत यासाठी मी उपोषणाला बसणार आहे. वाल्मिक कराडच्या टोळीत काही महिलाही सक्रीय होत्या.माझ्याकडे वाल्मिक कराडचे सगळे पुरावे आहेत. पुढच्या महिन्यात मी पत्रकार परिषद घेणार आहे. मुंडे यांच्या प्रकरणातील कराडची टोळी जेरबंद झालीच पाहिजे, असंही बाळा बांगर यांनी म्हटलं आहे.
Thailand-Cambodia conflict: सीमावादातून थायलंड-कंबोडियामध्ये संघर्ष तीव्र; चीनला नेमकं हवंय काय?
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील गुन्हेगारीच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडच्या परळमधील महादेव मुंडे खून प्रकरणही उजेडात आले. महादेव मुंडेंच्या खुनाचा तपास एसआयटी आणि सीआयडीमार्फत करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. त्यासाठी आज परळी-अंबाजोगाई महामार्गावर कन्हेरवाडी आणि भोपळा ग्रामस्थांकडून रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले. महादेव मुंडेंच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) देखील सहभागी झाले.