Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vilas Ghule Murder Case : ‘माझ्या मुलाला अडकवण्यासाठी जेलमधून कट’, ऑडिओ क्लिप ऐकवत बजरंग सोनावणेंचे वाल्मिक कराडवर गंभीर आरोप

Vilas Ghule Murder Case : बीडच्या विलास घुले हत्या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी वाल्मीक कराड आणि सुग्रीव कराड यांच्यावर गंभीर आरोप करत मुलाला अडकवण्यासाठी कट रचल्याचा दावा केला आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 01, 2026 | 03:30 PM
Bajrang Sonawane on Walmik karad

Bajrang Sonawane on Walmik karad

Follow Us
Follow Us:
  • बजरंग सोनवणेंनी वाल्मीक कराडवर गंभीर आरोप केले.
  • मुलाला हत्या प्रकरणात अडकवण्यासाठी कट रचल्याचा सोनवणेंचा दावा.
  • पत्रकार परिषदेत कथित ऑडिओ क्लिप ऐकवून फॉरेन्सिक तपासाची मागणी
 

बीड : केज तालुक्यातील विलास घुले हत्या प्रकरणाला (Vilas Ghule Murder Case) आता नवं वळण मिळालं आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेत वाल्मीक कराड आणि सुग्रीव कराड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या मुलाला म्हणजेच सौरभ सोनवणे याला या प्रकरणात अडकवण्यासाठी कट रचण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या आरोपांच्या समर्थनार्थ सोनवणे यांनी ऑडिओ क्लिपही पत्रकारांना ऐकवली.

जेलमधून फोन केल्याचा सोनवणेंचा दावा

सोनवणे यांच्या दाव्यानुसार, वाल्मीक कराडने कारागृहातून सुग्रीव कराडला फोन केला आणि सौरभ सोनवणे याला विलास घुले हत्या प्रकरणात अडकवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवणे, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करणे आणि रास्ता रोको करण्यास सांगितल्याचाही दावा त्यांनी केला.

या  संभाषणाची ऑडिओ क्लिप सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत ऐकवली. संबंधित रेकॉर्डिंगची सत्यता तपासण्यासाठी ती फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Mira Bhayandar News: ‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरून मनसे आक्रमक, सचिन पोपळेंचा नरेंद्र मेहतांवर निशाणा

‘माझ्या मुलाला अडकवण्याचा कट’

बजरंग सोनवणे यांनी दावा केला की, विलास घुले यांच्या हत्येच्या सुरुवातीच्या एफआयआरमध्ये आपल्या मुलाचं नाव नव्हतं. मात्र, नंतर पुरवणी जबाबात सौरभ सोनवणे यांचं नाव आल्याने त्यांनी यावर प्रश्न उपस्थित केले. आपल्या मुलाचा या हत्येशी कोणताही संबंध नसल्याचं सोनवणे यांनी पुन्हा स्पष्ट केलं. यापूर्वीही त्यांनी मुलाचा सहभाग सिद्ध झाल्यास त्याला स्वतः पोलिसांच्या ताब्यात देण्याची भूमिका मांडली होती.

दरम्यान, या प्रकरणात सौरभ सोनवणे यांची एसआयटीने चौकशीही केली होती. त्यामुळे आता सोनवणे यांनी केलेल्या नव्या आरोपांमुळे या प्रकरणातील राजकीय आणि तपासाच्या चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे.

सोनवणे यांनी बीड कारागृह प्रशासनावरही प्रश्न उपस्थित केले असून, कारागृहातून मोबाईल आणि सिमच्या वापराबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणातील कथित कॉल रेकॉर्डिंग, कारागृहातील हालचाली आणि आपल्या मुलाचं नाव पुरवणी जबाबात कसं आलं, याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

सोनवणे यांनी केलेल्या आरोपांमुळे राज्यात खळबळ उडाली असून कथित ऑडिओ क्लिपची सत्यता आणि त्यातील आवाज नेमका कोणाचा आहे, याची अधिकृत पुष्टी अजून झालेली नाही. हि पुष्टी झाल्यानंतरच या दाव्यांबाबत अंतिम निष्कर्ष निघू शकतो. त्यामुळे आता तपास यंत्रणा या आरोपांकडे कशा पद्धतीने पाहते आणि पुढे काय कारवाई होते, याकडे लक्ष लागलं आहे.

‘गांxxx दम नाही तर कशाला…’, संजय राऊतांनी शेअर केली मीनाक्षी शिंदेंची कथित ऑडिओ क्लिप; ठाण्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप

Web Title: Vilas ghule murder case bajrang sonawane walmik karad audio clip vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • Beed Crime
  • Beed News
  • Walmik Karad

संबंधित बातम्या

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला
1

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला

सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी
2

सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.