tunisha sharma
पालघर: पालघरमधल्या (Palghar News) एका फिल्म स्टुडिओला आग लागली आहे. एका अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की वसईतल्या कामन भागातील भजनलाल स्टुडिओमध्ये (Bhajanlal Studio) शुक्रवारी रात्री आग लागली. त्यांनी सांगितलं की, हा स्टुडिओ अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर चर्चेत आला होता. वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, शनिवारी पहाटे चार वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.(Palghar Fire News)
[read_also content=”मे महिन्यातल्या दुसऱ्या रविवारीच ‘मदर्स डे’ का होतो साजरा ? इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या https://www.navarashtra.com/lifestyle/mothers-day-history-and-its-significance-nrsr-398778.html”]
अधिकाऱ्याने सांगितलं की, आग भजनलाल स्टुडिओमध्ये लागली जिथे गेल्या वर्षी 24 डिसेंबरला तुनिषा शर्माने ‘अली बाबा: दास्तान ए काबुल’च्या सेटवर आत्महत्या केली होती. तुनिषाच्या मृत्यूनंतर तिचा सहकलाकार शिझान खानला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर 5 मार्चला त्याला जामीन मिळाल्याने त्याची सुटका करण्यात आली.