
परसोडी येथे शनिवारी सायंकाळी ७वाजता काही मुले शेकोटीजवळ बसली होती. त्याच वेळी आकाशातून अर्ध्या विटेच्या आकाराचे, दोन तुकडे जळत जमिनीवर कोसळले. तुकडे पडताच मोठा प्रकाश निर्माण झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. या घटनेची माहिती किशोर वाहने यांनी पोलिसांना दिली. ते दोन्ही दगड घेऊन पोलिस स्थानकात पोहोचले.
दगड सिमेंटच्या दगडांसारखे दिसत असले तरी वजनाने कापसासारखे हलके आणि सच्छिद्र आहेत. परिसरामध्ये आयुध निर्माणी (ऑर्डनन्स फॅक्टरी) असल्याने सुरुवातीला नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र हे दगड आकाशातून पडल्याने हा ‘उल्कापाताचा’ प्रकार असावा असा अंदाज आहे.
Kolhapur News : RTE प्रवेशाबाबत शाळांची उदासिनता; शाळा प्रशासन, पालक यांच्यातील वाद विकोपाला
करण्यासाठी कोलकाता देवीला अभ्या या दगडांच्या नमुन्यांचा सखोल अभ्यास एक विशेष चमू भंडाऱ्यात येईल, ‘जळते दगड’ उल्का की अवकाश कचरा याचा उलगडा तपासणीनंतरच होईल.
अभिषेक नामदास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, भंडारा