यामुदतीत सर्व नोंदणी पात्र शाळांनी नोंदणी प्रक्रीया पूर्ण करून घ्यावयाची आहे. शाळांच्या नोंदणी करता अंतिम दिनांक हा १९ जानेवारी हा आहे. आरटीई अंतर्गत पूर्व प्राथमिक व इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यां ना प्रवेश दिला जातो. जे विद्यार्थी अर्थिक दृष्टया दुर्बल आहेत आशा विद्यार्थ्यांना २५ टक्के जागा आरक्षित करण्यात येतात. त्यामुळे सर्व सामान्य कुटूंबातील पालकांना आरटीई अंतर्गत आधार मिळतो. त्यामुळे मागील काही वर्षांपासून आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी पालकांची धडपड चालू होते, संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होत असल्याने कागद पत्रांच्या पूर्तता होण्यासाठी पालकांची धावपळ चालू होते.
मागील शैक्षणिक वर्षांत आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या अनेक पालकांना याचा वाईट अनुभव आल्याचे पालक उघड पणे बोलून दाखवताना दिसत आहे काहि विना अनुदानित व स्वयंम अर्थसहाय्यीत शाळांनी आरटीई अंतर्गत प्रवेश दिला खरा मात्र काही शाळा या प्रक्रिया राबवीत नाहीत किंवा त्या वेळेत कोटा (प्रवाशाच्या 25%) कळवीत नाहीत, तसेच बऱ्याचदा प्रवेश मिळाल्यानंतर पालकांकडून पैशांची मागणी केली जाते, काही वेळेला विद्यार्थ्यांचा प्रवेश घेतल्यानंतर शासनाकडून शाळांना पैसे वेळेत जमान झाल्यास संबंधित विद्यार्थ्याला शाळेत त्रास दिला जातो किंवा संबंधित पालकांकडून पैशांची मागणी होते, पालक वैतागून आपला पाल्य शाळेतून काढून दुसऱ्या शाळेत (कमी फी असेल) आपल्याला परवडेल अशा शाळेत प्रवेश घेताना, जुन्या शाळा (जिथे पाल्य शिकत होता मागील फी भरा नाहीतर दाखला मिळणार नाही, अशा प्रकान त्रास दिल्याच्या अनेक घटना गेल्या वर्षभरात हातकणंगले तालुक्यात घडल्या आहेत त्यामुळे एकी कडे पालक आरटी प्रवेशा साठी उस्तुक असताना शाळांची असणारी उदासिनता चर्चेचा विषय ठरू लागली आहे.






