स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आता 'हा' पक्ष करणार एंट्री; सांगलीच्या जतमध्ये...
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील सहा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतिपदाची निवड करण्यासाठी सोमवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात जिल्ह्यातील चार पंचायत समितींवर महायुतीचा झेंडा अर्थात भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी सत्ता काबीज केली. तर दोन पंचायत समितींवर महाविकास आघाडीला समाधान मानावे लागले.
हेदेखील वाचा : विरोध झाला तरीही आदिती तटकरे, गिरीश महाजनांना मिळणार ‘हा’ अधिकार; महत्त्वपूर्ण माहिती समोर
भंडारा जिल्हा परिषदेसह सर्व पंचायत समितीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळ पूर्ण झाला आहे. ही मुदत संपल्याने पुढील अडीच वर्षांसाठी सभापती व उपसभापती निवड करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी, भंडारा, लाखांदूर या ठिकाणी भाजपसह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वर्चस्व दिसून आले.
पवनी पंचायत समिती काँग्रेसच्या हाती
पवनी पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे नारनवरे हे सभापती म्हणून तर उपसभापती भाजपचे प्रमोद मेंढे यांची निवड झाली. भंडारा पंचायत समितीमध्ये भाजपच्या कल्पना कुर्जेकर यांची सभापती म्हणून तर उपसभापती म्हणून राष्ट्रवादीचे नागेश भगत यांची निवड झाली. तुमसर पंचायत समितीमध्ये सभापतिपदी राष्ट्रवादीच्या दीपा गौपाले तर उपसभापती भाजपच्या सुभाष बोरकर यांची निवड झाली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध अनेक इच्छुकांसह नेतेमंडळींनाही लागले आहेत. त्यावर नेतेमंडळींकडून विधाने केली जात आहेत. त्यात महसूलमंत्र्यांनीही भाष्य केले. ते म्हणाले, ‘ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अपेक्षित आहे. त्यानंतर महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिकांचे निवडणूक कार्यक्रम टप्प्याटप्प्याने जाहीर केले जातील. दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक पाहून निवडणूक आयोगाला निवडणुकीची तारीख जाहीर करण्याची विनंती करू’.
हेदेखील वाचा : ‘महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद नाहीत, काही कुरबुरी असतील तर…’; चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान