बीड: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडला केज कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वाल्मीक कराडचा ताबा सध्या एसआयटीकडे देण्यात आले होते. दरम्यान वाल्मीक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. दरम्यान, वाल्मीक कराडला आज बीड कोर्टात हजर करण्यात आले. एअसायटीकडून कोर्टात वाल्मीक कराडच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. दरम्यान सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने वाल्मीक कराडला 7 दिवसांची कोठडी सुनावली आहे. वाल्मीक कराड आता 22 जानेवारीपर्यंत एसआयटी कोठडीत असणार आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडवर मकोका लावण्यात आला आहे, एसआयटीकडून वाल्मीक कराडच्या 10 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. दरम्यान एसआयटीने बीड कोर्टात वाल्मीक कराडवर या आधी दकाहल असणाऱ्या गुन्ह्यांची यादी देखील सादर केली आहे. तसेच मकोका कसा लावला याबाबत एसआयटीने कोर्टात माहिती सादर केली. सुनावणीदरम्यान कोर्टात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
बीड कोर्टात वाल्मीक कराडची इन कॅमेरा सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान कोर्ट रूममध्ये आरोपी, आरोपी पक्षाचे वकील, तपास अधिकारी, सरकारी वकील उपस्थित होते. वाल्मीक कराडने संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी संतोष देशमुख यांना धमकी दिली असा दावा एसआयटीने कोर्टात केला. फरार आरोपी आणि वाल्मीक कराड यांच्यात काही संबंध आहे का याकहा तपास करायचा असल्याचे सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितले. फरार आरोपीना कोणी मदत केली याकहा तपास सुरू आहे.
न्यायमूर्तींचा तपास अधिकाऱ्यांना सवाल
वाल्मीक कराडला अटक करताना हत्येच्या गुन्ह्यात आरोपीचा सहभाग तपासला होता का? असा प्रश्न न्यायाधीशांनी सरकारी वकिलांना केला.
एसआयटी/सरकारी पक्षाकडून कोर्टात काय युक्तीवाद?
1. देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी कराड, घुले आणि विष्णू चाटे यांच्यात फोनवर संभाषण झाले.
2. तिघांमध्ये 3 वाजून 20 मिनिटे टे 3 वाजून 30 मिनिटे संभाषण झाले.
3. तिघांमध्ये काय संभाषण झाले याचा तपास करायचा आहे?
4. संतोष देशमुख यांचे अपहरण आणि संभाषण होण्याची वेळ मिळतीजुळती
5. एफआयआरमध्ये संतोष देशमुख यांचे तीन वाजता अपहरण झाल्याचा उल्लेख
6. हत्या प्रकरणातील सर्व आरोपी सराईत गुन्हेगार
वाल्मिक कराड याचा ‘तो’ फ्लॅट सील होणार
पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात असलेल्या पार्क स्ट्रीट या उच्चभ्रू सोसायटीतील वाल्मिक कराड आणि त्याची पत्नी मंजली यांचा 4BHK फ्लॅट मिळकत कर न भरण्यास सील केला जाणार आहे, मग त्याचा लिलाव ही केला जाईल, असे पिंपरी चिंचवडच्या महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा: Santosh Deshmukh: संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मीक कराडवर ‘MCOCA’; खुनाचा गुन्हा दाखल होणार?
कराड समर्थक आक्रमक
वाल्मीक कराडवर मकोका लावल्यानंतर आणि 7 दिवसांची एसआयटी कोठडी सुनवण्यात आल्यानंतर त्याच्या मूळ गावात समर्थक आक्रमक झाले आहेत. वाल्मीक कराडचे समर्थक अनेक ठिकानो आंदोलन करत आहेत.