वाल्मीक कराडला न्यायालयीन कोठडी (फोटो- सोशल मिडिया)
बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणात केज कोर्टाने वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मीक कराडला केज कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याधी केज कोर्टाने वाल्मीक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली होती. आज वाल्मीक कराडची सीआयडी कोठडी संपली होती. त्यामुळे आज वाल्मीक कराडला पुन्हा केज कोर्टात हजर करण्यात आले होते. याशिवाय कराडवर मकोका (MCOCA) लावण्यात आला आहे.
वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे आता वाल्मीक कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता वाल्मीक कराडचा ताबा सीआयडीने मागितला आहे. दरम्यान सीआयडीने कोर्टाने अर्ज दाखल केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात खूनाच्या गुन्ह्याची सीआयडीला चौकशी करायची आहे. त्यामुळे वाल्मीक कराडला सीआयडी कोठडी द्यावी अशी विनंती कोर्टात केली जाणार आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचा काही संबंध आहे का? याचा तपास सीआयडीला करायचं आहे. हत्या प्रकरणातील आरोपी आणि वाल्मीक कराड यांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान आता या प्रकरणात वाल्मीक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल होतो का हे पहावे लागणार आहे.
वाल्मिक कराडचा आणखी एक घोटाळा उघड
अमर पालकर नावाच्या शेतकऱ्याने वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात हार्वेस्टर मशिनचे शासकीय अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रत्येकी आठ लाख रूपये घेण्यात आल्याचा दावा पालकर यांनी केला आहे. अमर पालकर यांच्या म्हणण्यानुसार, 14 सप्टेंबर 2023 रोजी सह्याद्री अतिथीगृहात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना भेटून अनुदानासाठी पैसे दिल्याची माहिती देण्यात आली होती. मुंडे यांनी लवकरच अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.
राज्यातील 141 हार्वेस्टर मालकांनी प्रती हार्वेस्टर 8 लाख रुपये वाल्मिक कराडला दिले होते. परळी आणी पनवेल मध्ये हे पैसै देण्यात आले होते. नवी मुंबईतील पनवेल येथील देवीस रेसिडेन्सीमधील 17 नंबरच्या रूममध्ये वाल्मिक कराड, नामदेव सानप, व जितु पालवे या तिघांकडे पैसै दिल्याचे पालकर यांनी सांगितलं आहे. पैसे दिल्यानंतरही अनुदान न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी विचारणा केली असता, त्यांना धमक्या व मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. शेतकऱ्यांनी पुढील कारवाई न झाल्यास मंत्रालयासमोर सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे. या प्रकरणाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही कल्पना असून, त्यांनी दुर्लक्ष केल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा: Big Breaking: वाल्मीक कराडला 14 दिवसांची CID कोठडी; केज कोर्टाचा मोठा निर्णय
वाल्मीक कराडचे आत्मसमर्पण
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड याने आज सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले. सीआयडीने आतापर्यंतच्या केलेल्या तपासातून वाल्मिक कराड महाराष्ट्रातच असल्याची माहिती होती. त्यानुसार, आता कराड याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचे दिसत आहे. दरम्यान, कराड याची 100 हून अधिक बँक खाती गोठवण्यात आली आहे. वाल्मिक कराड महाराष्ट्रात असल्याचे तपासातून समोर आले होते. वाल्मिक कराडच्या शोधासाठी सीआयडीचे विशेष पथकही रवाना करण्यात आले होते. आजपासून सीआयडीच्या आणखी चार टीमही कराडच्या शोधासाठी पाठवण्यात येणार होत्या. तत्पूर्वी त्याने स्वत:हून आत्मसमर्पण केले.