मालेगाव बॉम्ब ब्लास्टमधील निर्दोष सुटलेल्या आरोपींना हायकोर्टाची नोटीस
6 आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे निर्देश
एनआयए कोर्टाने केलेली मुक्तता
Malegaon Bomb Blast: महाराष्ट्रातील मालेगाव शहरातील प्राणघातक बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेचे विशेष न्यायालय १७ वर्षांनंतर म्हणजेच ३१ जुलै रोजी निकाल दिला आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने निकाल देताना सर्व सात आरोपींना निर्दोष मुक्त केले होते. मात्र आता या निर्दोष आरोपींची अडचण वाढण्याची शक्यता आहे. कारण हायकोर्टाने त्यांना नोटीस पाठवली आहे. हे प्रकरण नेमके काय आहे, हे जाणून घेऊयात.
एनआयएने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी यांची मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणी निर्दोष मुक्तता केली होती. मात्र पीडितांच्या कुटुंबाने या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिले होते. त्या याचिकेवर सुनावणी पार पडली. त्यानंतर हायकोर्टाने या 7 ही आरोपीना नोटीस जारी केली आहे.
हायकोर्टाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील 7 आरोपीना नोटीस जारी केली आहे. यामध्ये हायकोर्टाने नोटीस बजावून 6 आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. पीडित कुटुंबाने दाखल केलेल्या याचिकेनंतर हायकोर्टाने आरोपींना 6 आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
एनआयएने मालेगाव स्फोट प्रकरणात एकूण ७ जणांना आरोपी बनवले होते. यासोबतच भोपाळच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा यांना मुख्य आरोपी बनवण्यात आले होते. याशिवाय कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, अजय राहिलकर, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी आणि सुधाकरधर द्विवेदी यांना आरोपी बनवण्यात आले होते. पुराव्याअभावी न्यायालयाने या सर्व आरोपींना निर्दोष सोडले आहे.
एटीएस आणि एनआयएच्या आरोपपत्रात खूप फरक आहे.
मोटारसायकलमध्ये बॉम्ब होता हे सिद्ध करण्यात सरकारी वकिलांना अपयश आले आहे.
प्रसाद पुरोहित यांनी बॉम्ब बनवला आणि तो पुरवला याचा कोणताही पुरावा नाही. बॉम्ब कोणी ठेवला हे सिद्ध होऊ शकले नाही.
घटनेनंतर तज्ञांकडून पुरावे गोळा करण्यात आले नाहीत.
पुरावे दूषित झाले आहेत.
घटनेनंतर त्या ठिकाणी दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली आणि स्थानिक लोकांनी पोलिस दलावर हल्ला केला.
तपास यंत्रणांना बाईक साध्वीची असल्याचे सिद्ध करण्यात अपयश आले.
तपास यंत्रणांचा दावा आहे की बाईक साध्वीची होती परंतु सरकारी वकिलांना बाईकचा चेसिस नंबर सापडला नाही.
निकाल वाचताना न्यायालयाने म्हटले की प्रत्यक्षदर्शींनी त्यांचे जबाब बदलले आहेत.
अभिनव भारतचे नाव वारंवार घेतले जात आहे, प्रसाद पुरोहित विश्वस्त होते, अजय राहिरकर कोषाध्यक्ष होते, दोघांच्याही खात्यात पैशांच्या व्यवहाराचे पुरावे आहेत परंतु हे पैसे दहशतवादी कारवायांसाठी वापरले गेले नाहीत. पुरोहित यांनी बांधकाम कामासाठी हे पैसे वापरले.